IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाची होणार चौकशी !

IAS Pooja Khedkar Case Central government called Report : वाशिम येथे गेल्यानंतर पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी केलेल्या उद्योगांची माहिती समोर आली. यूपीएससीची परीक्षा देताना आपले उत्पन्न कमी दाखविता यावे, यासाठी आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी दाखविले आहे, असा संशय आता..
IAS Pooja Khedkar Family
IAS Pooja Khedkar FamilySarkarnama
Published on
Updated on

Pune News : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून काम करताना केलेल्या उद्योगांची दखल घेत युपीएससीने त्यांना नोटीस बजावून तुमच्या विरोधात गुन्हा दाखल का केला जाऊ नये, अशी नोटीस बजाविली आहे. तसेच केंद्र सरकारने देखील त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

पूजा खेडकर यांनी आपल्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला असल्याचे दाखवित कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आई-वडिलांचा खरचं घटस्फोट झाला आहे की नाही, याची चौकशी देखील आता केली जाणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी आलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी केलेले अनेक चुकीचे आणि धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात असताना स्वतंत्र केबीन, कर्मचारी मिळावे यासाठी पूजा खेडकर यांनी अधिकाऱ्यांना त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून अनेक अधिकाऱ्यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी (Collector) सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.

त्यानंतर दिवसे यांनी राज्य सरकारला अहवाल पाठवित पूजा खेडकर यांना इतर जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी पाठवावे, अशी विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने त्यांना वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी पाठविले होते.

IAS Pooja Khedkar Family
Sassoon News : रुग्णाला निर्जनस्थळी टाकणारा ससूनमधील डॉक्टर निलंबित !

वाशिम येथे गेल्यानंतर पूजा खेडकर यांनी आयएएस (IAS) होण्यासाठी केलेल्या उद्योगांची माहिती समोर आली. यूपीएससीची परीक्षा देताना आपले उत्पन्न कमी दाखविता यावे, यासाठी आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याचे त्यांनी दाखविले आहे, असा संशय आता येऊ लागला आहे.

यामधील तथ्य शोधून काढण्यासाठी खरोखर त्यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खोटेपणा आढळल्यास त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांनी घेतलेले अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर देखील अनेकांनी आक्षेप घेतले असून याची चौकशी देखील केली जाणार आहे.

IAS Pooja Khedkar Family
Manorama Khedkar : 'वेळेवर खायला मिळत नाही'; मनोरमा खेडकरांनी वाचला तक्रारींचा पाढा

पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबाकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. असे असतानाही परीक्षा देताना त्यांनी कमी उत्पन्न दाखविले असल्याची तक्रार केली जात आहे. आपल्या आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून पूजा यांनी याचा फायदा घेतला असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे त्यांची आई मनोरमा खेडकर, वडील दिलीप खेडकर या दाम्पत्याचा खरच घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहे. याचा सविस्तर अहवाल देखील केंद्र सरकारच्या वतीने मागविण्यात आला आहे. यामध्ये काही तथ्य आढळल्यास पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com