Karnataka Politics, H. D. Kumaraswamy, H. D. Deve Gowda Sarkarnama
देश

Karnataka Politics : देवेगौडा कुटुंबात 'या' मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन वादाची ठिणगी; पक्षप्रमुखांसोबतची चर्चाही फिस्कटली

H. D. Kumaraswamy Statement : 'या' जागेवर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली जाईल.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka News : कर्नाटक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. येत्या 10 मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.यानंतर कर्नाटकातील प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आरोप प्रत्यारोपांनी कर्नाटकातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, उमेदवारीवरुन देवेगौडा कुटुंबातील वादही उफाळून आल्याचं समोर आलं आहे.

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी हासन येथील जागेवर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली जाईल असं वारंवार स्पष्ट केलं आहे. याचवेळी कर्नाटक( Karnataka Election) विधानसभा निवडणुकीत हासन मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख एच डी देवेगौडा यांची सून भवानी रेवण्णा ठाम असल्याची चर्चा आहे.

कुमारस्वामी यांनी हासन मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत आपल्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. आपले वडील आणि पक्षप्रमुख देवेगौडा याबाबत अंतिम निर्णय घेतील. यावरून देवेगौडा यांच्या कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याची चिन्हे दिसत आहे.

कोण आहेत भवानी रेवण्णा?

भवानी रेवण्णा या कुमारस्वामी यांचे मोठे बंधू आणि माजी मंत्री एच डी रेवण्णा यांच्या पत्नी आहेत. त्या हासन जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. या उमेदवारीसाठी त्यांना त्यांच्या पतीसह खासदार प्रज्वल आणि विधान परिषदेचे आमदार सूरज रेवण्णा या मुलांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.

देवेगौडा यांची मध्यस्थीही निष्फळ?

हासन मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन निर्माण झालेल्या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी माजी पंतप्रधान व पक्षप्रमुख एच डी. देवेगौडा यांनी मध्यस्थी केली आहे. त्यांनी रविवारी आपले दोन पुत्र व भवानी यांच्याबरोबर चर्चा केली. मात्र, या चर्चेतून ही कोंडी फुटू शकली नसल्याची चर्चा आहे.

असं आहे सध्या कर्नाटकातलं संख्याबळ..

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कुणाला कौल देणार याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहेत. कर्नाटकात एकूण 5,21,73,579 मतदार आहेत. त्यात 100 हून अधिक वयाचे 16 हजाराहून अधिक मतदार आहेत. येत्या 24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT