Thackeray-Fadanvis News: संजय राऊतांनी भाजप -शिवसेनेच्या घोटाळेबहाद्दरांची यादीच फडणवीसांना पाठवली : पहा कोण आहेत ते नेते

संजय राऊत यांनी पत्रातून काही नेत्यांची नावे पाठवत फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली आहे.
Sanjay Raut- Devendra Fadanvis
Sanjay Raut- Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Thackeray-Fadanvis News: गेल्या काही महिन्यांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत.राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्या घरांवर कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. तपास यंत्रणांच्या कारवायांवर विरोधी पक्षनेत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कारवायांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काही घोटाळ्यांबाबत खुलासे केले आहेत. तसेच या घोटाळ्याच्या पुराव्यासह त्यांना भेटण्याची इच्छाही राऊत यांनी व्यक्त केली आहे.

वाचा, काय म्हटलंय संजय राऊतांनी पत्रात

प्रिय देवेंद्रजी,

जय महाराष्ट्र!

आताच (१ एप्रिल) मी आपले एक विधान ऐकले व गृहमंत्री म्हणून आपला अभिमान वाटला.आपण म्हणता, "मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार!" देवेंद्रजी आपण घेतलेल्या या भूमिकेबद्दल आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय ? आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत करवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. गेल्या चार महिन्यांपासून आपण मला याबाबत भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Maharashtra Politics: सत्तासंघर्षात कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात! मुंबईत राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला...

मी खालील भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो

१) आपल्या मंत्रिमंडळातील श्री. दादा भुसे (मालेगाव) यांनी 'गिरणा अॅग्रो' नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी श्री. भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे. व त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.

२) किरीट सोमय्या यांनी 'विक्रांत' युद्ध नौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना क्लीन चिट' दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी, अशी माझी विनंती आहे.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Gajanan Marne Gets Bail: कोथरुडमधील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा तुरुंगाबाहेर येणार; 'या' प्रकरणी जामीन मंजूर

(३) भाजपचे आमदार सन्माननीय श्री राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौंड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरशः लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इच्छितो.

वरील बेकायदेशीर प्रकरणांबाबत 'पुरावे सादर करण्यासाठी मी आपणास भेटू इच्छितो. कृपया आपल्या सोयीची वेळ कळवावी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com