Rahul Gandhi with Ilhan Omar Sarkarnama
देश

Rahul Gandhi : अमेरिकेतील महिला खासदाराच्या भेटीने राहुल गांधी वादात; नेमकं काय आहे प्रकरण?

Rajanand More

New Delhi : अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी वादात अडकले आहेत. अमेरिकेतील एका महिला खासदाराच्या भेटीनंतर हा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपने राहुल यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.

इल्हान उमर असे या महिला खासदाराचे नाव आहे. उमर या कट्टरपंथी असून भारतद्वेष्ट्या असल्याचे मानले जाते. त्यांनी अनेकदा भारतविरोधी भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. त्यांनी पाकव्याप्त काश्मीरला भेट दिली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे राहुल यांच्या भेटीवरून वाद निर्माण झाला आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजू वर्मा यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘राहुल गांधी सत्तेत येण्यासाठी उतावीळ झाले आहे. या उतावळेपणामुळे कट्टरपंथी इस्लामिक इल्हान उमर यांच्याशी कुणी भेटू शकतो.’ भाजपचे नेते निशिकांत दुबे यांनीही निशाणा साधला आहे. इल्हान उमर खलिस्तान आणि काश्मीरला वेगळे देश बनविण्याचे समर्थन करतात. राहुल गांधी याच अजेंड्यासाठी समर्थन मिळवत असल्याचे दुबे यांनी म्हटले आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही राहुल यांनी घेरले. इल्हान भारतविरोधी, कट्टरपंथी इस्लामिक आणि स्वतंत्र काश्मीर हवे असलेल्या आहेत. या भेटीमुळे पाकिस्तानलाही आश्चर्य वाटले असेल. काँग्रेस आता उघडपणे भारतविरोधी काम करत असल्याचा आरोप मालवीय यांनी केला आहे.

कोण आहेत इल्हान उमर?

राहुल आणि इल्हान यांची भेट वॉशिंग्टन डीसीमध्ये रेबर्न हाऊस ऑफिस बिल्डींगमध्ये झाली. ब्रेडली जेम्स शर्मन यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या भेटीत खासदारांचे एक शिष्टमंडळ राहुल यांना भेटले. यामध्ये इल्हान यांचाही समावेश होता. इल्हान या खासदार असून 2019 मध्ये निवडून आल्या आहेत. संसदेत पोहचलेल्या त्या पहिल्या आफ्रिकी शरणार्थी आहेत. तसेच संसदेत पोहचलेल्या पहिल्या दोन मुस्लिम-अमेरिकी महिलांपैकी त्या एक आहेत.

अमेरिकेत इस्त्रायलविरोधी भूमिकेबाबत ते ओळखल्या जातात. इल्हान यांनी 2022 मध् पाकिस्तानव्याप्त काश्मीरचा दौरा केला होता. या दौऱ्यासाठी पाकिस्तानने फंडिंग केल्याचे समोर आले होते. इल्हान यांना त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठीही ओळखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिकच्या संसदेतील भाषणावर बहिष्कार टाकला होता. त्यांनी अनेकदा भारतावर टीका केली आहे. भारत अल्पसंख्यांक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT