New Delhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या अमेरिकेतील दौऱ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या दौऱ्यात त्यांनी आरक्षणावर केलेल्या विधानावर भाजपसह इतर पक्षाच्या नेत्यांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही राहुल यांच्यावर चांगलेच भडकले आहेत.
अमित शाह यांनी बुधवारी ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींना आव्हान दिले आहे. देशविरोधी बोलणे आणि देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे राहणे ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची सवय झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी चढवला आहे.
जम्मू-काश्मीरमधील ‘जेकेएनसी’च्या देशविरोधी आणि आरक्षणविरोधी अजेंड्याला पाठिंबा देणे किंवा परदेशात भारतविरोधी बोलणे असो, राहुल गांधींनी नेहमीच देशाची सुरक्षा आणि भावना दुखावल्या असल्याचा संतापही शाह यांनी व्यक्त केला आहे. भाषा, प्रदेश आणि धर्मांधर्मात भेदभावावर बोलणे हे राहुल गांधी यांची फुटीरतावादी विचारसरणी दर्शवते, असेही शाह यांनी म्हटले आहे.
देशातून आरक्षण संपवण्याची भाषा करून राहुल गांधींनी काँग्रेसचा आरक्षणविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे. मनातील विचार आणि कल्पना नेहमी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून बाहेर पडतात. पण जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही आणि देशाच्या एकात्मतेशी कोणी खेळू शकत नाही, असे आव्हान अमित शाह यांनी राहुल यांना दिले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांना अमेरिकेतील एका कार्यक्रमात आरक्षण कधीपर्यंत सुरू राहणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी जोपर्यंत निष्पक्षता येत नाही, असे उत्तर दिले होते. तसेच तशी स्थिती आता नसल्याचेही ते म्हणाले होते. त्यावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे. राहुल यांन जातनिहाय जनगणनेवरही या कार्यक्रमात जोर दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.