Deltacron
Deltacron 
देश

सावधान! महाराष्ट्रासह सात राज्यामंध्ये नव्या व्हेरीयंटचा शिरकाव

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जगभरात एकापाठोपाठ आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट ओसरली होती. असे असतानाच COVID-19 चे नवीन रुग्ण पुन्हा वाढू लागल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे. ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरीयंटपासून तयार झालेल्या नव्या व्हेरीयंटचे नाव डेल्टाक्रॉन (Deltacron) असे आहे.

एका रिपोर्टनुसार, डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण भारतात ही आढळून आले आहेत. भारतात महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये डेल्टाक्रॉन विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि दिल्ली यांचा समावेश आहे. कोरोनाच्या गेल्या तीन लाटांमधील परिस्थिती पाहता हा नवा व्हेरिएंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

डेल्टाक्रॉनची प्रमुख लक्षणे

राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन आणि डेल्टा यांच्या संयोगाने तयार झालेल्या या विषाणूची लक्षणे पूर्वीच्या कोरोना विषाणूसारखीच आहेत. शास्त्रज्ञ अजूनही विषाणूचे निरीक्षण करत असून त्याच्या इतर लक्षणांचाही शोध घेत आहेत.डेल्टा विषाणू हा सर्वात प्राणघातक व्हेरीयंट मानला जातो. आता डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या मिश्रणाने डेल्टाक्रॉन तयार झाला आहे. त्यामुळे जर एखाद्याला नव्या विषाणूची लागण झाली तर संक्रमित व्यक्तीला काही सौम्य किंवा काही गंभीर लक्षणे जाणवू शकतात.

डेल्टाक्रॉन व्हेरिएंटची ओळख कशी पटली?

डेल्टाक्रॉन व्हेरीयंट विषाणू फेब्रुवारी 2022 मध्ये झाली. पॅरिसमध्ये Institute Pasteur च्या शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट आढळून आला होता, जो मागील व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.

उत्तर फ्रान्समधील एका वृद्ध व्यक्तीला पहिल्यांदा डेल्टाक्रॉन विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. त्याची तपासणी केल्यानंतर हा व्हेरिएंट अगदी वेगळा दिसत होता. त्याचे बहुतेक जेनेटिक्स हे डेल्टा प्रकारासारखेच होते. परंतु या विषाणूचा भाग जो विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला एन्कोड करतो आणि तो पेशींच्या आत आत जाण्यासाठी करतो तो ओमिक्रॉनमधून आल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT