रशियाच्या संरक्षणमंत्र्यांना हृदयविकाराचा झटका की घातपात?

russia-ukraine war| Vladimir Putin| रशियाकडून घातपाताचा संशय
Vladimir Putin- Sergei Shoigu
Vladimir Putin- Sergei Shoigu

रशियाचे (Russia) संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु (Sergei Shoigu) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्याशी झालेल्या वादानंतर सर्गेई शोइगु यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. तर पुतिन यांनी युक्रेनमधील विशेष लष्करी मोहिमेच्या अपयशासाठी त्यांना दोष दिल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा युक्रेनचे (Ukraine) मंत्री अँटोन गेराश्चेन्को यांनी केला आहे. (Russia-ukraine war latest news)

संरक्षण मंत्री 11 मार्चपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. 24 मार्च रोजी सर्गेई शोइगु पुन्हा टेलिव्हिजनवर दिसले. मात्र, हे फुटेज नवीन की जुने हे कळू शकलेले नाही. सर्गेई शोइगु हे रशिया-युक्रेन युद्धाचे दुसरे सूत्रधार मानले जातात, अशीही माहिती समोर आली आहे.

Vladimir Putin- Sergei Shoigu
विधानसभा अध्यक्षपदाचा मान भाजपला! राज्याच्या इतिहासात प्रथमच महिलेला संधी

दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव वर ताबा मिळवण्यात अपयशी ठरल्याने शोइगु यांना शिभा देण्यात आली असावी, अशी शक्यताही युक्रेनने वर्तवली आहे. तर क्रेमलिनने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतही पत्रकारांनी संरक्षणमंत्र्यांचा ठावठिकाणा विचारल्याचा दावा गार्डियनच्या अहवालात करण्यात आला आहे.

तर अहवालानुसार, क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सांगितले की, संरक्षण मंत्री विशेष लष्करी ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत आणि मीडिया हालचालींसाठी ही योग्य वेळ नाही. त्यानंतर काही वेळातच संरक्षण मंत्री पुतिन यांच्यासोबतच्या सुरक्षा परिषदेच्या टेलिकॉन्फरन्समधील क्लिपमध्ये टेलिव्हिजनवर दिसल्याचा दावाही करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com