PM Modi remark row : देशाच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेले विधान गाजत आहे. तमिळनाडूमध्ये खर्गेंनी पंतप्रधानांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्यानंतर भाजपचे नेते खर्गेंनी तुटून पडले. वाद निर्माण झाल्यानंतर खर्गेंनी सारावासारव केली असली तरी भाजपने हा मुद्दा चांगलाच तापविला असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
भाजपच्या खर्गेंविरोधातील आक्रमक भूमिकेनंतर आता उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही खर्गेंवर एकाच व्यासपीठावरून खोचक टीका केली. खरंतर राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतींकडून एखाद्या सार्वजनिक व्यासपीठावरून राजकीय भाष्य केले जात नाही. मात्र, आज राधाकृष्णन यांनी खर्गेही उपस्थित असलेल्या कार्यक्रमातून त्यांना पंतप्रधानांविषयीच्या विधानावरून अप्रत्यक्ष टोला लगावला.
कर्नाटकातील बिदर येथे आयोजित डॉ. बसवलिंगा पत्तादेवरू महास्वामीजी हिरेमठ संस्थेच्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यासह खर्गेही उपस्थित होते. उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणादरम्यान खर्गे हे आपले चांगले मित्र असल्याचेही सांगतिले. पण त्याचवेळी राजकीय भाष्यही केली.
उपराष्ट्रपती म्हणाले, खर्गे आणि माझ्यामध्ये काही थोडा फरक आहे. खरंतर फक्त दृष्टीचा. कधी-कधी आपल्याला असे वाटते की, खर्गेजींना काळा आणि पांढऱ्यातील फरक करू शकत नाहीत. कधी कधी दहशतवाद आणि दहशतवाद्यांमधील फरक करू शकत नाहीत. ही बाब सोडली तर आम्ही चांगले मित्र आहोत.
उपराष्ट्रपतींच्या विधानाच्या टायमिंगवरून चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधानांविषयी खर्गेंनी केलेल्या विधानानंतर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांची तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. अशावेळी थेट उपराष्ट्रपतींनी समोरासमोर हे विधान केल्याने राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, खर्गे यांनी या वादावर खुलासा करताना सांगितले की, आपण पंतप्रधानांना दहशतवादी म्हणालो नाही. पंतप्रधान आणि त्यांचे सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून राजकीय पक्ष आणि नेत्यांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणण्याचा आपला हेतू होता. ते दहशतवादी आहेत, असे मी कधी म्हणाले नाही. ते सातत्याने धमकीचे राजकारण करत असल्याचा त्याचा अर्थ होता, असे खर्गे यांनी वादानंतर सांगितले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.