Maharashtra Government : फडणवीस सरकारकडून शिक्षकांना खूशखबर : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

Maharashtra, teacher relief schemes, Satara IT development news : सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळणार आहेत.
Maharahtra Mantralay
Maharahtra Mantralay sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (22 एप्रिल) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांसाठी मोठी खूशखबर आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेत देण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.

बायोगॅस धोरण

महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सीबीजी), २०२६ जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युइटी तत्वावर राबविण्यात येणार आहे. यावर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या धोरणामुळे घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्याने हा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांना मूळ वेतन

राज्यातील ७ आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण देण्यावरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Maharahtra Mantralay
Manoj Naravane book : जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत रणकंदन, आता आणखी एक पुस्तक; शशी थरूर ठरले कारणीभूत...

आयटी पार्कसाठी जमीन

सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास ४२.५५ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार व व्यवसायाच्या संधी मिळणार आहेत.

Maharahtra Mantralay
India vs Pakistan : पाकिस्तानने भारताविरोधात घेतला मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असतानाच काढला आदेश, 24 मेपर्यंत...

अधिमूल्याची पुनर्रचना

राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना करण्याबाबतची अधिसूचना काढण्यास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महसूल खात्याअंतर्गतहा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Shambhuraj Desai-Satyajeet Patankar
BJP Leader Arrest : भाजपच्या विद्यमान उपसभापतीला जमिनीच्या बनावट दस्ताऐवजप्रकरणी अटक; साताऱ्यात खळबळ
Devendra Fadnavis
Dinesh Trivedi with PM Narendra Modi
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com