Prakash Karat, Vrinda Karat Sarkarnama
देश

CPM मध्ये मोठा बदल; 'सामर्थ्यवान' जोडपे बाहेर पडण्याच्या तयारीत; नव्या महासचिवाचे नाव जाहीर

CPM leadership change Prakash Karat, Vrinda Karat resignation:प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार यांची पक्षाच्या सेंट्रल कमेटीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

Mangesh Mahale

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी)मध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. माकपच्या पॉलिट ब्यूरोमध्ये 8 नव्या सदस्यांचा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश करात,वृंदा करात आणि माणिक सरकार यासारखे नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत.

पॉलिट ब्यूरोच्या नव्या सदस्यांमध्ये यू वासुकी, विजू कृष्णन, मरियम धावले, श्रीदीप भट्टाचार्य, अमरा राम आणि के बालकृष्णन यांचा समावेश आहे. पॉलिट ब्यूरोतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार यांची पक्षाच्या सेंट्रल कमेटीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

दरम्यान केरळचे पूर्व मंत्री एमए बेबी यांची पक्षाच्या 24 व्या अधिवेशनात महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माकपच्या एका गटाने त्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला आहे.

सीपीएमच्या 24 व्या अधिवेशनाची नुकतीच सांगता झाली. यात पक्षात मोठा बदल करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या पक्षाची अवस्था खालावली आहे. पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

1954 मध्ये केरळच्या प्रक्कुलममध्ये एमए बेबी यांचा जन्म झाला. शालेय जीवनात ते केरल स्टूडेंट्स फेडरेशनमध्ये सहभागी झाले होते. नंतर केरल स्टूडेंट्स फेडरेशनचे नाव बदलून स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया करण्यात आल्या. ते 1986 ते 1998 या काळावधीत राज्यसभेचे सदस्य होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीत निर्णय घेण्यात येणारी सर्वोच्च संस्था म्हणजे पॉलिट ब्यूरोच्या सदस्यपदी एमए बेबी हे 2012 पासून कार्यरत आहेत. गेल्या वर्षी सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर पक्षाचे महासचिव पद रिक्त होते. त्यानंतर प्रकाश करात यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT