Crime News Sarkarnama
देश

Crime News: खासगी फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवले! तरुणीसह तिच्या आई-वडिलांनी संपवलं जीवन

Crime News: पुण्यातील लोहगडावरुन होणाऱ्या पतीला ढकलून देऊन त्याचा जीव घेणाऱ्या तरुणीची घटना ताजी असतानाच आता ही आणखी एक घटना समोर आली आहे.

Amit Ujagare

Crime News: पुण्यातील लोहगडावरुन होणाऱ्या पतीला ढकलून देऊन त्याचा जीव घेणाऱ्या तरुणीची घटना सध्या चर्चेत असताना नात्यांमधील बेबनावामुळं आणखी काही जीव गेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणीचे खासगी फोटो होणाऱ्या पतीला पाठवल्यानं या तरुणीनं आणि तिच्या आई-वडिलांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

कर्नाटकातील मसुरी इथं हा प्रकार घडला असून इथल्या एका २१ वर्षीय तरुणीच्या लग्नाची तयारी सुरु होती. संबंधित आरोपी तरुणानं पीडित तरुणीला आधी प्रपोज केलं होतं, त्यावेळी या तरुणीनं आपल्या आई-वडिलांसमोरच त्याला नकार दिला होता. याचाच राग मनात असल्यानं तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या माथेफिरु तरुणानं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तरुणीचे काही खासगी फोटो पाठवले. तसंच या तरुणीसह तिच्या आई-वडिलांवर आपल्याशीच तिचं लग्न व्हावं यासाठी दबाव टाकत होता. याप्रकारामुळं बदनामी झाल्यानं त्रास दिला जात असल्यानं सोमवारी २१ वर्षीय तरुणीसह तिची ४४ वर्षीय आई आणि ५४ वर्षीय वडील यांनी आपलं जीवन संपवलं. आज बुधवारी, २४ जून रोजी या तरुणीचा विवाह होणार होता.

२१ जूनच्या रात्री मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी मुलाला आणि त्याच्या पालकांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण या आरोपी मुलाकडं कोणाकडूनतरी पीडित तरुणीचे काही खासगी फोटो आणि मेसेज मिळाले. हे फोटो तिनं आपल्या फोन मधून डिलीट केलेले होते, ही माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

पण हे डिलीट केलेले फोटो आरोपी तरुणानं मिळवले आणि ते तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या मोबाईलवर पाठवून दिले. हे फोटो पाहिल्यानंतर नवऱ्या मुलाला आणि त्याच्या कुटुंबियांना अक्षरशः धक्काच बसला. यानंतर ते तातडीनं नवरी मुलीच्या घरी आले आणि त्यानंतर त्यांच्यात होणाऱ्या लग्नासंदर्भात तिखट चर्चा झाली असावी. त्यानंतर पीडित तरुणीनं आणि तिच्या आई-वडिलांनी विष पिऊन स्वतःचं जीवन संपवलं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला असून याचा तपास सुरु केला आहे.

दरम्यान, रिलेशनशीपच्या समस्यांमधून आपल्या जोडीदाराचा जीव घेण्याबदद्लची पुण्यातील लोहगडावर घडलेली घटना आणि आताची ही कर्नाटकातील घटनेतून तरुणांमध्ये निर्माण झालेली ही असुरक्षिततेची भावना जीवघेणी ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT