NSE Scam, Chitra Ramakrishna , anand subramanian sarkarnama
देश

NSE Scam:आनंद सुब्रम्हण्यम यांना अटक ; अज्ञात योगीचा छडा लागणार

आनंद यांना अटक झाल्याने अज्ञात योगीचा छडा लावण्यात सीबीआयला मदत मिळणार आहे. सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) को-लोकेशन प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात सीबीआयने आनंद सुब्रमण्यन (Anand Subramanian) यांना आज सकाळी अटक केली आहे. आनंद यांना अटक झाल्याने अज्ञात योगीचा छडा लावण्यात सीबीआयला मदत मिळणार आहे. सीबीआयने आनंद सुब्रम्हण्यमची तीन दिवस चौकशी केली होती.

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी अध्यक्ष चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) आणि आनंद सुब्रमण्यम यांना सेबीने दंड ठोठावला होता. रामकृष्ण यांची गेल्या आठवड्यात कसून चौकशी केली होती. यात रामकृष्ण यांचे ई-मेल आणि अज्ञात योगीशी झालेल्या विशिष्ट भाषेतील संवादाचा उलगडा करण्यासाठी सुब्रमण्यम यांची चौकशी केली, मात्र तपासाला सहकार्य करत नसल्याने आज सुब्रमण्यम यांना सीबीआयने अटक केली. (NSE Scam News Updates)

सुब्रम्हण्यम यांना चेन्नईतून सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. आनंद सुब्रम्हण्यम हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी व्यवस्थापकीय संचालक आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चित्रा रामकृष्ण यांनी हिमालयातील एका अज्ञात योगीला गोपनीय माहिती पुरवली असल्याचा ठपका सेबीने ठेवला आहे. चित्रा रामकृष्ण या एप्रिल २०१३ ते डिसेंबर २०१६ या काळात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

तीन वर्षांसाठी बाजारातील सर्व कामाकाजात सहभागी होण्यास चित्रा रामकृष्ण आणि सुब्रहमण्यम यांना बंदी घालण्यात आली आहे. सेबीने यासह NSE ला रामकृष्ण यांच्याकडून 1.54 कोटी रुपयांचा स्थगित बोनस आणि अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT