वॉशिंग्टन : रशियाच्या घोषणेनंतर युक्रेनमधील परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे. युक्रेनची राजधानी कीवसह अनेक ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे. एवढेच नाही तर हे हल्ले टाळण्यासाठी युक्रेनचे नागरिक सुरक्षित ठिकाणी जात आहेत. गुरुवारी पहिल्या दिवशी १३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्धात अमेरिकनेनं (America)मोठी घोषणा केली आहे. रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी रशियावर आर्थिक निर्बध लादले आहेत. रशियात सैन्य पाठवण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. ''रशियाने जर अमेरिकेवर सायबर हल्ला केला तर त्याला अमेरिका चोख उत्तर देईल,'' असे बायडन यांनी रशियाला सुनावले आहे.
युक्रेनविरोधात रशियाने युद्ध पुकारले आहे. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झाले आहेत. रशिया आणि युक्रेनच्या वादात इतर देश हस्तक्षेप करत नसून युक्रेन रशियासोबत एकटा लढत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाटो देशांवर मोठा आरोप केला आहे. रशियाविरोधातल्या युद्धात युक्रेनला एकटं पाडल्याचे झेलेन्सकी यांनी सांगितले. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. देशातल्या सायबर हॅकर्सने सहकार्य करावे रशियन सैन्याची हेरगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वलोडिमिर जेलेंस्की (President Volodymyr Zelensky)म्हणाले, ''''रशियासोबत लढण्यासाठी युक्रेनला एकटे सोडले गेले आहे. आमच्यासोबत लढण्यासाठी कोण उभे आहे? मला काही दिसत नाही. युक्रेनला नाटो सदस्यत्वाची हमी देण्यासाठी कोण तयार आहे? प्रत्येक जण घाबरत आहे. आम्ही आमच्या १३७ हिरोसह नागरिकांना गमावले आहे. तर ३१६ जण जखमी झाले आहेत,"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.