CRPF Jawan's Secret Marriage to Pakistani Woman : केंद्रीय राखीव पोलिस दलाने ४१व्या बटालियनमधील जवान मुनीर अहमद यास तत्काळ प्रभावाने नोकरीवरून काढले आहे. कॉन्स्टेबल म्हणून तैनात असलेल्या मुनीर अहमदने एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले होते आणि त्याने हे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते.
मुनीरला त्याची पत्नी पाकिस्तानी नागरीक आहे, हे माहीत असूनही त्याने तिचा व्हिसा संपल्यानंतरही तिला आपल्यासोबतच ठेवले. त्याने जाणूनबुजून एका पाकिस्तानी नागरिकास आश्रय दिल्याचे दिसून आल्याने त्याच्याविरोधात कडक कारवाई केली गेली आहे.
प्राप्त माहितीनुसार मुनीर याचे हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले. हा जवान शेवटी देशाच्या प्रमुख अतंर्गत सुरक्षा दलाच्या ४१व्या बटालियनमध्ये तैनात होता. त्याला आता कोणत्याही चौकशीची आवश्यकता नसलेल्या नियमांनुसार सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, मुनीर यांचे हे पाऊल राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले. हा सैनिक शेवटचा देशाच्या प्रमुख अंतर्गत सुरक्षा दलाच्या ४१ व्या बटालियनमध्ये तैनात होता. अधिकृत सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, त्यांना कोणत्याही चौकशीची आवश्यकता नसलेल्या नियमांनुसार सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.