Former West Bengal governor news : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मागील वर्षी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. त्यातच आता पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचा सी. व्ही. आनंद बोस यांनी नुकताच अचानक राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी या राजीनाम्यामागचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.
सीव्ही आनंद बोस यांनी रविवारी मीडियाशी बोलताना सूचक विधान करत चर्चेला तोंड फोडले आहे. आपण विचारपूर्वकच राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे बोस यांनी म्हटले आहे. याचे कारण योग्य वेळ येईपर्यंत गोपनीय राहील, असे बोस यांनी म्हटल्याने चर्चांना उधाण आले आहे. धनखड यांनी सुरूवातीला आरोग्याचे कारण दिल्याची चर्चा होती.
कोलकाता विमानतळावरून आपले मुळ राज्य असलेल्या केरळला निघालेले बोस हे आठवडाभरापूर्वीच बंगालचे मतदार झाले आहेत. आपण मतदानाला परत येऊ, असेही केरळला जाताना ते म्हणाले. राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले, खेळ कधी थांबवायचा, याबाबत एक नियम असतो. राज्यपाल म्हणून मलाही माहिती होते की, एंट्री झाल्यानंतर एक्झिटही असेल. मला स्वत:च निर्णय घेण्यास सांगितले होते. मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
मी राज्यपाल म्हणून १२०० दिवस पूर्ण केले आहेत. क्रिकेटच्या भाषेत त्याचा अर्थ १२ शतके असा होतो. हे खूप आहे. थांबण्याचीही एक वेळ असते. माझ्यासाठी बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ असल्याचा मी विचार केला, असेही बोस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काल राष्ट्रपती द्रौपदी मुमू यांच्याबाबतच्या प्रोटोकॉलचे पश्चिम बंगालमध्ये उल्लंघन झाल्यावरून मोठे राजकीय वादळ उठले आहे. यावर बोस यांनी सावध प्रतिक्रिया दिली.
राज्यपाल असताना वारंवार बोस आणि बंगाल सरकारमध्ये वाद होत असत. पण प्रोटोकॉल उल्लंघनावर बोलताना बोस यांनी राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, ‘राष्ट्रपती खूप अनुभव, संतुलित आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी जे सांगितले, त्यामागे त्यांची काही कारणे नक्कीच असतील. पण त्यांच्या टिपण्णीवर बोलण्याचा मला काही अधिकार नाही.’
बोस हे केरळातील कोट्टायम येथील आहे. ते भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. केंद्र सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते भाजपचे सदस्य असून २३ नोव्हेंबर २०२२ पासून बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यांनी चार दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.