Raj Thackeray : राज ठाकरे रायगडावरून करणार ‘नवी सुरूवात’; म्हणाले, गजबजलेल्या सर्व ठिकाणी टेबल्स लागली पाहिजेत...

MNS foundation day, Raj Thackeray Raigad visit : सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे, याचा राग सर्वांच्या मनात किती आहे, हे सदस्य नोंदणीतून स्पष्ट होईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
Raj Thackeray Raigad visit
Raj Thackeray Raigad visitSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Navnirman Sena news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईसह अन्यत्रही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबईत तर उद्धव ठाकरे आणि राज्य ठाकरे तब्बल २० वर्षांनी एकत्रित येऊनही त्याचा मनसेला फायदा झाला नाही. यापार्श्वभूमीवर सोमवारी (ता. ९ मार्च) मनसेचा २० वा वर्धापनदिन आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यादिवशी रायगडावर जाऊ नवी सुरूवात करणार आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारपासून पक्षाची सदस्य नोंदणी सुरू केली होणार आहे. त्याची सुरूवात राज ठाकरे हे स्वत: रायगडावर जाऊन करणार आहे. याविषयी त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे.

रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच. अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत. आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे, अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.  

Raj Thackeray Raigad visit
Balen Shah : महापौर ते थेट देशाचे सर्वोच्च पद! बालेन शाह यांची संपत्ती PM मोदींएवढीच..!

तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या. सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत. ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

Raj Thackeray Raigad visit
नितीश कुमार नव्हे भाजपचा 'हा' नेता आहे ‘पलटू राम’; हा घ्या पुरावा...

मार्केट, शाळा, मंदिरं, कॅालेज, मैदानं, बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंसं करत ही सभासद नोंदणी करा. प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे, याचा राग सर्वांच्या मनात किती आहे, हे देखील स्पष्ट होईल. त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा, असे आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com