Dawood Ibrahim Mumbai property auction price Sarkarnama
देश

Dawood Ibrahim : अखेर दाऊद इब्राहिमच्या ‘त्या’ मालमत्तांची 35 वर्षांनी विक्री; खरेदीदार सापडला, किती दिले पैसे?

Dawood Ibrahim property sold after 35 years : दाऊद इब्राहिमच्या जप्त मालमत्तांचा 35 वर्षांनंतर लिलाव झाला. खरेदीदार कोण आणि किती किंमत मिळाली याची संपूर्ण माहिती वाचा.

Rashmi Mane

Dawood Ibrahim assets auction details: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनींना अखेर 35 वर्षांनंतर खरेदीदार मिळाला आहे. केंद्र सरकारकडून 5 मार्च रोजी घेण्यात आलेल्या लिलावात मुंबईतील एका बोलीदाराने या चारही शेती जमिनींसाठी सर्वाधिक बोली लावली. स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स कायद्याअंतर्गत (SAFEMA) ही कारवाई करण्यात आली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विक्री प्रक्रिया आता मार्गी लागली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबाके गावात या चारही जमिनी आहेत. हे गाव दाऊद इब्राहिमचे मूळ गाव मानले जाते. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यातील काही जमिनी पूर्वी त्याची आई अमीना बी यांच्या नावावर होत्या.

या लिलावात सर्वाधिक बोली लावणारा व्यक्ती मुंबईतील असल्याचे सांगितले जात आहे, मात्र त्याची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. नियमानुसार, त्याला एप्रिल 2026 च्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित प्राधिकरणाची अंतिम मंजुरी मिळाल्यावर या जमिनींचा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल.

या जमिनींची विक्री यापूर्वी अनेकदा करण्याचा प्रयत्न झाला होता, पण प्रत्येक वेळी लिलाव अपयशी ठरला. नोव्हेंबर 2025 मध्ये सुद्धा सुमारे 30 टक्के राखीव किंमत कमी करूनही कोणताही खरेदीदार पुढे आला नव्हता. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी-कंपनीशी संबंधित नाव असल्यामुळे अनेकांनी या मालमत्तांपासून दूर राहणे पसंत केले. तसेच या जमिनी गावात असून केवळ शेतीसाठी वापरण्याची अट आणि त्वरित नफा न मिळण्याची शक्यता हेही कारण ठरले.

ही सर्व मालमत्ता कासकर कुटुंबाच्या वडिलोपार्जित संपत्तीचा भाग होती. 1990 च्या दशकात ती जप्त करण्यात आली आणि नंतर केंद्र सरकारने ताब्यात घेतली. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर संबंधित कारवाई करण्यात आली होती. अनेक वेळा अपयशी ठरलेल्या या लिलावाला अखेर यश मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT