Corona Death
Corona Death Sarkarnama
देश

धक्कादायक : दोन कोरोना रुग्णांचे मृतदेह तब्बल 15 महिन्यांनी सापडले शवागारात

सरकारनामा ब्युरो

बेंगलुरू : कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झालेल्या रुग्णांचे मृतदेह गंगा नदी पात्रात तरंगत असल्याचे फोटो काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. त्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोपही झाले. पण आता आणकी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या दोन रुग्णांचे मृतदेह तब्बल 15 महिन्यांनी रुग्णालयाच्या शवागारात आढळून आले आहेत. दोन्ही मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे.

बेंगलुरूमधील राज्य कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालयातील शवागारात 26 नोव्हेंबर रोजी हे मृतदेह सापडले आहेत. रुग्णालयातील एक कर्मचारी शवागारातील कोल्ह स्टोरेजची साफसफाई करण्यासाठी गेल्यानंतर खूप दुर्गंधी सुटल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने शवागारातील फ्रिजर पाहिल्यानंतर हे मृतदेह दिसून आले. त्यावरील टॅगनुसार 40 वर्षीय दुर्गा आणि 35 वर्षीय मुनिराजू यांचे हे मृतदेह होते. त्यानंतर हे दोन्ही मृतदेह पुरण्यात आले.

जुलै 2020 मध्ये दोघांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नियमानुसार अंत्यविधीसाठी हे मृतदेह बेंगलुरू महापालिकेकडून नेले जाणार होते. त्याआधी हे मृतदेह जुन्या शवागारात ठेवण्यात आले. पण त्यानंतर तिकडे कुणाचंही लक्ष्य गेलं नाही. डिसेंबर 2020 मध्ये राज्य शासनाने रुग्णालयात नवे शवागर उभारले.

नवे शवागर तयार झाल्यानंतर जुन्हा शवागारातील दोन मृतदेहांकडे दुर्लक्ष झालं. तब्बल 15 महिन्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले आहे. हे प्रकार समोर आल्यानंतर राजाजीनगर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांची शोधाशोध सुरू करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या मतदारसंघाचे भाजपचे आमदार व माजी मंत्री एस सुरेश कुमार यांनी या अमानवी प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

एस. सुरेश कुमार म्हणाले, बेंगलुरू महापालिका आणि रुग्णालयाचा या घटनेतील निष्काळजीपणा अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करावी. सविस्तर अहवालाच्या आधारे निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कुमार यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT