ही तर खाकी वर्दीची गुर्मी! रडणाऱ्या मुलीचा व्हिडीओ पाहून न्यायालय संतापलं

रस्त्यातच अडवून वडिलांवर चोरीचा आळ घेतल्यानंतर मुलीने हंबरडा फोडला होता.
High Court
High CourtSarkarnama

कोची : रस्त्याने जाणाऱ्या बाप-लेकीला एका महिला पोलिसानं अडवलं अन् त्यांच्यावर आपला मोबाईल चोरल्याचा आरोप केला. वडिलांची झाडाझडती सुरू होताच मुलगी जोरजोरात रडू लागली. पण पोलिसाला तिची दया आली नाही. दोघांनीच मोबाईल चोरल्याच्या आरोपावर पोलीस ठाम होते. या घटनेचा सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडीओ केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) न्यायाधीशांनी पाहिला अन् त्यांनाही गहिवरून आलं. संतापलेल्या न्यायालयानं मग पोलिसांची झाडाझडती घेतली.

दरम्यान, महिला पोलिसाचा मोबाईल काही वेळातच पोलीस व्हॅनमध्येच सापडला. हा प्रकार घडला त्यावेळी एकाने त्यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला. तेव्हा व्हॅनमध्येच मोबाईल असल्याचे स्पष्ट झालं. मोबाईल सापडल्यानंतर पोलिसांनी बाप-लेकीची माफी न मागताच काढता पाय घेतला. या सर्व प्रसंगाचा सुमारे पाच मिनिटांचा व्हिडीओ न्यायाधीशांनी पाहिला. त्यानंतर ही घटना म्हणजे खाकीचा अंहकार अन् गुर्मीचे संकेत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले.

High Court
आ देखे जरा किसमें कितना है दम...! मलिकांचं भाजप नेत्याला खुलं आव्हान

हा प्रकार 27 ऑगस्ट रोजी केरळ (kerala) मध्ये घडला आहे. अत्तिंगल येथे राहणारे जयचंद्रन हे आल्या आठ वर्षाच्या मुलीसह मूनुमुक्कू येथे गेले होते. या मुलीला थुंबा येथील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राला पाहायचे होते. या परिसरात रजिता या महिला पोलिस अधिकाऱ्याकडे वाहतूक नियमनाचे काम होते. पोलीस व्हॅनशेजारून जाताना अचानक महिला पोलिसाने बाप-लेकीला अडवून मोबाईल चोरीचा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिला पोलिसाची बदली करण्यात आली.

दरम्यान, याप्रकरणी आठ वर्षाच्या मुलीने संबंधित महिला पोलिसाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच 50 लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे. सुनावणीवेळी घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर न्यायाधीश देवन रामचंद्रन म्हणाले, मुलगी सुरूवातीपासूनच रडत आहे. पण अधिकाऱी जराही विचलित झाली नाही. एक महिला आणि आई या नात्याने त्यांनी मुलीचे अश्रू पुसून तिला दिलाया द्यायला हवा होता.

High Court
देशमुख, परमबीरसिंह, वाझे हे तिघंही आले एकत्र अन्...

व्हिडीओ खूपच विचलित करणारा आहे. यातील दृश्यांनी मीही हादरून गेलो. मुलगी सतत रडत होती. ती खूप घाबरली होती. आपल्या वडिलांवर पोलिसांकडून असा आरोप लावला गेला तर कोणतंही मुल असचं करेल. महिला पोलिसाने त्यांची माफी मागायला हवी होते. मुलीला चॉकलेट द्यायला हवे होते. हे प्रकरण तिथेच थांबले असते. पण त्याऐवजी पोलिसांनी आपण योग्य असल्याचे म्हटले. हे अज्ञान नव्हे तर खाकीची गुर्मी, अहंकार आहे, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने संबंधित महिला पोलिस अधिकाऱ्यावर ताशेरे ओढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com