Pune Crime News  Sarkarnama
देश

Custodian Death: कोठडीत बाप-लेकाचा जीव घेणाऱ्या 'त्या' 9 पोलिसांना फोशीची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय

Custodian Death: कोरोना लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत अमानुष छळ करणाऱ्या आणि त्यांचा जीव घेणाऱ्या ९ पोलिसांना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Amit Ujagare

Madurai Custodian Death: कोरोना लॉकडाऊनच्या काळात नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत अमानुष छळ करणाऱ्या आणि त्यांचा जीव घेणाऱ्या ९ पोलिसांना कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं एकच खळबळ उडाली आहे. तमिळनाडूमध्ये हा प्रकार घडला होता, २०२० मध्ये ही घटना घडली होती. या घटनेचा अखेर कोर्टानं सोमवारी निकाल लावला. न्या. मुथुकुमारन यांनी निकाल देताना म्हटलं की, ही खूपच दुर्मिळ घटना आहे ज्यामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांनीच स्वतः कायद्याचं उल्लंघन केलं आहे.

नेमका प्रकार काय?

18 जून 2020 च्या रात्री जेव्हा जवळच्या दुकानात काही कामगार आपल्या कामाची वाट पाहत होते, तेव्हा पोलिसांनी तिथं येऊन या दोघांना शिवीगाळ केली तसंच तिथून निघून जायला सांगितलं. यावेळी जयराजनं पोलिसांची ही शिवीगाळ ऐकली त्यामुळं त्यांना काही मिनिटं थांबण्यास सांगितलं. त्यानंतर एका पोलीस कॉन्स्टेबलनं ही खबर आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जयराजला त्याच्या दुकानातून जबरदस्तीनं पोलीस स्टेशनला नेलं. त्यानंतर जयराजचा मुलगा बेनिक्स सथानकुलम हा नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहोचला आणि आपल्या वडिलांना सोडून द्यावं यासाठी पोलिसांकडं विनंती केली. पोलिसांनी जयराजचा छळ केला याला बेनिक्सनं विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी या बाप-लेकाला पोलीस ठाण्यात अत्यंतिक छळ केला. यामध्ये त्यांना गंभीर जखमा झाल्या.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना कळवलं की, त्या दोघांना उद्या सकाळी सोडून देण्यात येईल, त्यांचे नवे कपडे त्यांनी घेऊन यावं. पण प्रचंड मारहाण झाल्यामुळं अत्यवस्थ झालेल्या बाप-लेकाला २० जून २०२० रोजी वैद्यकीय चाचणीसाठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं. यावेळी रक्ताळलेले त्यांचे कपडे बदलण्यात आले, त्यानंतर त्यांना सथानकुलम कोर्टासमोर उभ करण्यात आलं. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. त्यांना पुढे केविलपट्टीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं. पण दोघांची तब्येत पोलिसांनी बेदम मारहाण केल्यानं खूपच बिघडल्यानं कोविलपट्टी सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर २२ जून २०२० रोजी बेनिक्सचा रक्तस्त्राव नियंत्रणाबाहेर गेला आणि तो बेशुद्ध झाला. त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जयराजनं छतीत दुःखत असल्याची तक्रार केली त्यानंतर त्याचाही रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर या व्यापारी पिता-पुत्रांचा मृत्यूमुळं मोठ्या प्रमाणावर आंदोलनही झालं.

कोर्टानं सुनावली फाशीची शिक्षा

दरम्यान, २४ जून २०२० रोजी मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाच्या न्या. पी. एन. प्रकाश आणि न्या. बी. पुगलेंधी यांच्या खंडपीठानं छळ आणि मृत्यूप्रकरणाची गंभीर दखल घेत कार्यवाही सुरु केली. कोर्टानं म्हटलं की, आम्ही या प्रकरणाची देखरेख करु आणि जनतेला शांतता राखण्याचं आवाहन केलं, त्यानंतर कोर्टानं या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात वारंवार कोर्टाच्या आदेशांकडं दुर्लक्ष केल्याचं आढळून आलं. त्यानंतर अखेर ६ वर्षे हा खटला चालून अखेर मदुराईच्या प्रथम अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायालायनं याप्रकरणी दोषी असणाऱ्या ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT