Baramati Election: बारामतीची पोटनिवडणूक होणार हायव्होल्टेज! बिनविरोध म्हणता म्हणता आलेत तब्बल 'इतके' अर्ज

Baramati Election: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
Baramati By Election .jpg
Baramati By Election .jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati Election: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी या मतदारसंघांमध्ये घडल्याचं पाहायला मिळालं.

Baramati By Election .jpg
Sharad Pawar news : ‘बिनविरोध’साठी राष्ट्रवादी आग्रही असतानाच शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, निवडणूक बिनविरोध करण्याचे कारण नाही!

सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, शेवटपर्यंत काँग्रेस उमेदवार देण्याबाबत ठाम राहिलं. त्यानुसार काँग्रेसने उमेदवार जाहीर केला आणि आज त्या उमेदवाराचा अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

Baramati By Election .jpg
Prajakta Tanpure : मुख्यमंत्र्यांकडून काय मिळालं आश्वासन? माजी मंत्री तनपुरेंनी शेवटच्या क्षणी फिरवलेला निर्णय कितपत योग्य?

तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत बारामती विधानसभेची निवडणूक लढायचीच असं चंग बांधलेल्या ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मात्र आज उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला.

असं असलं तरी आज दिवसभरात अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं पाहायला मिळाले. यामध्ये करुणा मुंडे आणि अभिजीत बिचुकले यांच्यासारख्या नेत्यांचा देखील समावेश होता.

Baramati By Election .jpg
Delhi Assembly Security Breach : राजधानीत मोठी खळबळ! दिल्ली विधानसभेत बॅरिकेडस् तोडत VIP गेटमधून कार आत घुसली, मुंबईत ATS ची मोठी कारवाई

सुरुवातीला अजित पवारांच्या निधनाने निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना काँग्रेसने भूमिका घेतली आणि त्यानंतर आता बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात अपक्षांचे अर्ज दाखल झाल्याचं समोर आलं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन अर्ज या मतदारसंघांमध्ये दाखल झाले होते आणि आता शेवटच्या दिवशी तब्बल 55 उमेदवारांनी 68 अर्ज दाखल केले आहेत.

Baramati By Election .jpg
Ashok Kharat : काल CM फडणवीसांची घोषणा, आज खरातच्या मागे लगेच लागली ED ; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल..

दाखल झालेल्या अर्जांची माहिती बारामती निवडणूक अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची जवळपास शक्यता मावळली असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. वाटाघाटीनंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी जरी अर्ज माघारी घेतला तरी देखील सुनेत्रा पवार विरुद्ध अपक्ष असा सामना निश्चितच रंगलेला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com