Jaipur News : नोंव्हेबर महिन्यात राजस्थानसह पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी भाजप व काँग्रेसकडून प्रचार सुरू करण्यात आला असून वेगळी रणनीती आखली जात आहे. राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर सलग दुसऱ्यावेळी पुन्हा ते सरकार सत्तेत येत नाही. त्यामुळे यावेळेस राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची सत्ता जाईल असा कयास बांधला जात होता.
मात्र, अशोक गेहलोत यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या प्रभावी कामांच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या पक्षाच्या पराभवाची पंरपरा गेहलोत खंडीत करतील अशी चर्चा आहे. दुसरीकडे भाजपकडे नेतृत्चाचा अभाव असल्याने व नवा चेहरा समोर आणला जात नसल्याने भाजपच्या तुलनेत काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आज तरी दिसत आहे.
आगामी काळात होत असलेली विधानसभेची निवडणुकीकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. नोंव्हेबर २०२३ साली विधानसभा निवडणूक होत आहे. आतापर्यंत गेल्या ३०वर्षाचा इतिहास पाहिला तर काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे भाजप नेतृत्वहीन वाटत आहे. भाजपकडून गेल्या काही दिवसापासून निवडणूक यंत्रणा राबवली जात असली तरीही त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवता आला नाही. त्यामुळे वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने त्यांच्याकडे जबाबदारी सोपवणार का नाही याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसने मात्र विश्वास पूर्ण प्रचाराला सुरुवात केली आहे.
१९९८ साली भैरवसिंह शेखावत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळीस पार्टीत नाराज होती. त्यानंतर नवीन चेहरा म्हणून वसुंधरा राजे यांना पुढे आणण्यात आले होते. त्यांनी १९९८ नंतर पार्टीची जबाबदारी घेत राजस्थानमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात यश आले होते.
२००३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसुंधरा राजेकडे सर्व जबाबदारी सोपवली होती. यामध्ये त्यांना यश आले होते. वसुंधरा राजेने २०० जागांपैकी ११५ सीट जिंकत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये भाजपला ४५ टक्के मते त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाली होती. त्यामुळे वसुंधरा राजे यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने दूर ठेवणे पसंद केले.
काँग्रेसने दुसरीकडे अशोक गेहलोत यांना १९९८ ते २००३, २००८ ते २०१३ आणि २०१८ ते २०२३ या काळात सरकारच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करीत भाजपवर मात केली आहे. राजस्थानचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या ठिकाणी एकावेळी एकच सरकार येते. दुसऱ्यावेळी पुन्हा ते सरकार सत्तेत येत नाही. त्यामुळे आता भाजपचे सरकार सत्तेत येईल, अशी आशा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासूनची गेहलोत यांनी घेतलेल्या प्रचारातील आघाडीमुळे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ही परंपरा खंडीत होण्याची शक्यता आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.