Rajnath Singh Reaction on Union Budget Sarkarnama
देश

Budget 2024 For Defence : संरक्षण बजेट 68 हजार कोटींनी वाढले ; सीमा सुरक्षा-देशांतर्गत उत्पादनांवर भर!

Rajnath Singh Reaction on Union Budget 2024 : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या अर्थमंत्र्यांचे मानले विशेष आभार, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?

Mayur Ratnaparkhe

Union Budget 2024 News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदा आपल्या अर्थसंकल्पाचा 12.9 टक्के हिस्सा संरक्षण क्षेत्रासाठी दिला आहे. परंतु हा अंतरिम बजेट पेक्षा बराच कमी केला आहे. यंदा संरक्षण बजेटसाठी 6,21,940 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. तर अंतरिम बजेटमध्ये ही घोषणा 6,21,541 कोटी रुपयांची होती.

मागील वर्षीच्या तुलनेत हे बजेट केवळ 4.72 टक्के वाढवलं गेलं आहे. मागील वर्षीचं संरक्षण बजेट 5.93 लाख कोटी रुपयांपेक्षा थोडं जास्त होतं. अर्थमंत्री या संरक्षण बजेटमध्ये 1.05 लाख कोटी रुपयांची घोषणा केवळ यासाठी केली, जेणेकरून आत्मनिर्भर भारत मिशन अंतर्गत देशातील कंपन्यांकडून संरक्षणाशी संबंधित खरेदी-विक्री होऊ शकेल, त्यांना प्रोत्साहन देता येईल.

सीमा सुरक्षेसाठी रस्ते निर्मिती आवश्यक आहे, त्यामुळे यंदा अर्थसंकल्पात बॉर्डर रोड्सच्या बजेटमध्ये 30 टक्के वाढ केली आहे. यासाठी 6500 कोटी रुपये दिले गेले आहे. डिफेन्स स्टार्टअप्ससाठी iDEX स्कीम अंतर्गत 518 कोटी रुपयांची घोषणा केली गेली आहे. जेणेकरून नवी शस्त्र आणि तंत्रज्ञान विकसित करता येईल.

जर मागील वर्षीच्या संरक्षण बजेटची तुलना केली तर, यंदा संरक्षण बजेटमध्ये 68,834 कोटी रुपयांची वाढ केले गेली आहे. तर वर्ष 2022-23मध्ये हे बजेट 5.25 लाख कोटी रुपयांपेक्षा थोडं जास्त होतं. यंदाच्या बजेटचा 27.67 टक्के हिस्सा म्हणजे 1.72 लाख कोटी रुपये भांडवली अधिग्रहणासाठी आहेत.

14,82 टक्के महसूल खर्च आणि ऑफरेशनल सज्जता म्हणजेच 92,088 कोटी रुपये. 30.68 टक्के पगार आणि भत्ते, 22.72टक्के पेन्शन म्हणजेच 41 लाख कोटी रुपये. 4.11 टक्के नागरी संस्थांना देण्यात आला आहे . तसचे भारतीय तटरक्षक दलाला 7651 कोटी रुपये आणि DRDOसाठी 23,855 कोटी रुपये देण्यात आला आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले? -

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह(Rajnath Singh) म्हणाले, मी अर्थमंत्र्यांना 6,21,940.85 कोटी रुपयांची सर्वाधिक तरतूद संरक्षण मंत्रालयासाठी केल्याबद्दल धन्यवाद देतो. जे आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारत सरकारच्या एकूण बजेटचा 12.9 टक्के आहे. 1,72,000 कोटी रुपयांचा भांडवली परिव्यय सशस्त्र दलांच्या क्षमतांना आणखी बळकट करेल. देशांतर्गत भांडवली खरेदीसाठी 1,05,518.43 कोटी रुपयांची तरतूद आत्मनिर्भरतेला अधिक प्रोत्साहन देईल.

याशिवाय त्यांनी म्हटले की, मला आनंद आहे की मागील वर्षाच्या तुलनेत कॅपिटल हेड अंतर्गत सीमा रस्त्यांच्या वाटपात 30 टक्के वाढ करण्यात आली आहे. बीआरओला 6,500 कोटी रुपयांच्या वाटपामुळे आमच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना आणखी चालना मिळेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT