Union Budget 2024 Live : अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग? जाणून घ्या...

Cheaper And Costlier In Budget 2024 : सातव्यांदा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. पण, अर्थसंकल्पात काय झालं स्वस्त, काय झालं महाग? याबद्दल जाणून घेऊया...
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

Budget 2024 : देशात मोदी सरकारचे तिसरे टर्म सुरू झालं आहे. 'मोदी 3.0' सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. अर्थमंत्री सीतारमण यांनी संसदेत सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला.

या अर्थसंकल्पात प्रामुख्यानं कृषी क्षेत्र आणि उत्पादकता, रोजगार कौशल्य, मानव संसाधन आणि विकास, शहरी विकास, उर्जा संरक्षण, अनुसंधान आणि विकास, नव्या पिढीसाठी कौशल्य योजनेवर भर दिला, असं अर्थमंत्री सीतारमण (nirmala sitharaman) यांनी सांगितलं आहे.

अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार? काय महाग होणार? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा करत दैनंदिन जीवनातील वस्तू स्वस्त केल्या आहेत. त्यात सोने-चांदी, मोबाईल फोन आणि चार्जरसारख्या गोष्टी स्वस्त होणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.

Nirmala Sitharaman
Union Budget 2024 : पाच वर्षानंतर करदात्यांना दिलासा; 17,500 रुपये वाचणार...

काय स्वस्त?

  • कॅन्सरच्या तीन औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्सरची तीन औषधे स्वस्त होणार आहेत.

  • मोबाईल फोन, सुटे भाग आणि चार्जरवरील आयात शुक्ल 15 टक्के कमी केलं आहे. त्यामुळे फोन, सुटे भाग चार्जरच्या किंमती कमी होतील.

  • सोने आणि चांदीवरील आयात शुल्क 6.5 टक्केऐवजी 6 टक्के करण्यात आलं आहे. त्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे.

  • पोलाद आणि तांब्याचे उत्पादन

  • लिथियम बॅटरी

  • इलेक्ट्रिक वाहने

  • सोलार सेट

  • चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू

  • पीवीसी फ्लेक्स बॅनर

  • विजेची तार

  • माशांपासून होणार उत्पादन

Nirmala Sitharaman
Parliament Budget Session 2024 Live Updates: अर्थसंकल्पात 'या’ 9 क्षेत्रांवर मोदी सरकारचा सर्वाधिक भर

महाग काय होणार?

  • प्लास्टिक उत्पादने महाग होणार

  • प्लास्टिक संबंधित असलेल्या उत्पादनांवरील आयात शुक्लात वाढ

  • पेट्रोलियम आणि अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुक्लात वाढ

  • हवाई प्रवास

  • सिगरेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com