Delhi Assembly Election 2025 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडलं आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57.70 टक्के मतदान झालं आहे. अंतिम आकडेवारी समोर आली नसली तरी आता एक्झिट पोलचे कौल समोर येण्यास सुरुवात झाली आहे. विविध एक्झिट पोलमध्ये भाजपने (BJP) जोरदार मुसंडी मारताना अरविंद केजरीवालांच्या आपला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजधानी नवी दिल्लीमध्ये विधानसभेची मतदानप्रक्रिया पार पडली असून आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत असून त्यात भाजप आणि आप (AAP) या दोन पक्षांमध्ये 'टफ फाईट' ची शक्यता दिसून येत आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची आपवर काहीशी सरशी असल्याचं दिसून येतंय. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली असून 8 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे.
आम आदमी पक्ष,भाजप ,काँग्रेस अशी तिरंगी लढत दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) होत आहे. मात्र, मतदानाच्या नंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षासाठी तिसऱ्यांदा सत्तेची वाट खडतर असल्याचे दिसून येत आहे.तर भाजप दहा वर्षांनंतर जोरदार कमबॅक करण्याची शक्यता विविध पोलमधून समोर येत आहे.
'मॅट्रिझ'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजप आणि आपमध्ये ‘काँटे की टक्कर’पाहायला मिळत आहे. भाजप आपपेक्षा काहीशा अधिक जागा घेऊन सत्तेत येण्याची शक्यता या मॅट्रिझ या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात येत आहे.या पोलमध्ये भाजपला 35-40 जागा तर आपला 32-37 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर 'चाणक्य स्ट्रॅटेजी'च्या एक्झिट पोलमध्ये भाजप 39-44 जागांपर्यंत पोहचण्याची शक्यता असून आपला 25-28 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.तसेच काँग्रेसला 2-3 जागा निवडून येऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'पोल डायरी'चा एक्झिट पोलमध्ये भाजपला 42-50 जागा, आपला 18-25 जागा तर काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याचवेळी 'पीपल्स इनसाइट'च्या एक्झिट पोलनुसार भाजपला 40-44 जागा, आपला 25-29 जागा आणि काँग्रेसचा ०-1 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत 2020 तुलनेत मतदानाची टक्केवारी घटली असल्याचे बोलले जात आहे. दिल्लीत एकूण 17 हजार 66 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दिल्लीमध्ये अंदाजे 1 कोटी 56 लाख मतदार मतदान करण्यास पात्र असल्याची माहिती समोर आसी होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.