Ramraje Naik Nimbalkar News : बारा तासांपासून निंबाळकरांच्या घरावर 'आयटी'ची छापेमारी अन् चौकशी सुरू, रामराजेंनी ठेवलं 'हे' सूचक स्टेटस

Sanjeevraje Naik Nimbalkar Raid आगामी काही दिवसांतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे.
Ramraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Satara News : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधु संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर बुधवारी (ता.5 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केलेल्या आणि आता रामराजे निंबाळकर संजीवराजे निंबाळकर आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आयकर विभागाची ही छापेमारी निंबाळकर कुटुंबियांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याचवेळी रामराजे निंबाळकरांनी (Ramraje Naik Nimbalkar) सूचक स्टेटस ठेवलं आहे.

रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत,तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.सकाळी 6 वाजतापासून सुरू असलेल्या या कारवाईला आता दहा तास उलटले असूनही ही चौकशी अद्याप सुरूच असल्याचे पुढे आले आहे.

आता आयकर विभागाच्या या कारवाईमुळे निंबाळकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून सकाळपासूनच त्यांनी निंबाळकरांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. याचमुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

Ramraje Naik Nimbalkar
Pune Politics : पालिका निवडणुकीची तयारी? पुण्याच्या नव्या-जुन्या पालकमंत्र्यांनी एका टेबलावर बसून ठरवला 'मास्टर प्लॅन'

याचदरम्यान, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकरांनी यांनी सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवलं आहे. या स्टेटसमधून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.त्यात त्यांनी'कृपया घरा बाहेर गर्दी करू नका,खात्याला आपले काम करू द्या,काळजी नसावी' असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आयकर विभागाच्या छापेमारीनंतर रघुनाथराजे निंबाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी आम्ही कुठल्याही चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. दोन नंबरचे धंदे केले नाहीत. त्यामुळे यामधून काही निष्पन्न होणार नाही, असा आत्मविश्वासही व्यक्त केला होता.

Ramraje Naik Nimbalkar
Uniform Civil Code news : आता देशभरात 'UCC' ची लाट येणार; उत्तराखंडनंतर आणखी एका राज्याकडून तयारी सुरु

संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आल्यानंतर घराबाहेर कार्यकर्ते जमले आहेत.बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नसून त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी वाढतच चालली आहे. या छापेमारीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.

आगामी काही दिवसांतच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com