New Delhi News: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी निधन झालं होतं. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा दुर्देवी अपघात झाला. बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला.या घटमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अजित पवार यांचा हा अपघात आहे की घातपात? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. अशातच, आता दिल्ली विमानतळावरुन एक मोठी घटना समोर येत आहे.
दिल्ली विमानतळावर गुरुवारी (ता.16)मोठी दुर्घटना टळली आहे.दोन विमानांचे पंखे एकमेकांना घासल्याचं समोर येत आहे. या घटनेनंतर विमानांची उड्डाणे थांबवण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच भेदरलेल्या सर्व विमान प्रवाशांना सुखरुपपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
स्पाईसजेट आणि अकासा एअरच्या विमानांच्या पंखांची ही टक्कर दिल्ली विमानतळावर झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.अकासा एअरचे विमान दिल्लीहून हैदराबादला निघाले होते.
काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावरही अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली होती.दोन विमानाची धडक झाल्याची घटना घडली आहे दोन विमानाची पंखं एकमेकांना घासली आहे.पण सुदैवानं मोठा अनर्थ टळला आहे.
देशातील सर्वात हवाई वाहतुकीसाठी व्यस्त असलेल्या मुंबई विमानतळावर 28 मार्च रोजी दोन विमानाची धडक झाल्याची घटना घडली होती .यावेळी एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाची ही धडक झाली होती. दोन्ही विमानाची पंखं एकमेकांना घासल्याचं दिसून आलं होतं. सुदैवाने दोन्ही विमानांचाा वेग कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप होती. पण या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचं किरकोळ नुकसान झालं होतं.
दिल्ली विमानतळावर झालेल्या या दुर्घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच दोन्हीही विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी या अपघातासंदर्भात निवेदनं प्रसिध्द करण्यात आली आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून हैदराबादला जात असलेलल्या अकासा एअरच्या QP 1406 या विमानाला आखाती प्रदेशात परतावे लागले आहे. तर अकासाचे विमान उभे असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाने त्याला धडक दिली. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
तर स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली विमानतळावर टॅक्सिंग करत असताना स्पाईसजेटचे बी 737-700 विमानाच्या पंखांची धडक झाली. ज्यात दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाचा उजवा पंख आणि डावा हॉरिझॉन्टल स्टेबिलायझर खराब झाला आहे. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाचे दिल्लीतील उड्डाणही थांबवण्यात आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.