Delhi Vidhan sabha Election 2025 Sarkarnama
देश

Delhi Assembly Election 2025 : दिल्लीत केजरीवालांच्या पराभवासाठी मोठा प्लॅन; अर्ज मागे घेण्याची मुदत संपताच झालं उघड

Arvind Kejriwal AAP BJP Congress Candidates : दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता.  

Rajanand More

New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. मागील दोन निवडणुकांपेक्षा यावेळी उमेदवारांच्या संख्येचा विक्रम झाला आहे. राज्यात 70 जागांसाठी तब्बल 699 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार असल्याने त्यांना विजयासाठी घाम गाळावा लागणार असल्याचे चित्र आहे.

दिल्ली विधानसभेची निवडणूक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यानंतर आता उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अखेरच्या दिवशी 20 जणांना आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतरही 699 उमेदवार रिंगणात उरले आहेत. मुंडका आणि नांगलोई जाट मतदारसंघातून सर्वात उमेदवारांनी माघार घेतली.

दिल्ली विधानसभेची यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. यावेळी मागील दोन निवडणुकींच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार मैदानात उतरले. 2015 मध्ये 673 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. तर 2020 च्या निवडणुकीत 668 उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी त्यापैकी 31 उमेदवार अधिक आहेत.

दिल्लीत सर्वाधिक उमेदवार नवी दिल्ली मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातून आपचे राष्ट्रीय संयोजक व माजी मुख्यमंत्री केजरीवाल निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी खासदार संदीप दीक्षित यांना उतरवले आहे. त्यांच्यासह 23 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आहेत. केजरीवाल 2013, 2015 आणि 2020 असे सलग तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

दिल्लीतील पटेलनगर आणि क्सतूरबा नगर मतदारसंघात सर्वात कमी प्रत्येकी पाच उमेदवार आहेत. तर करोल बाग, गांधीनगर, तिलकनगर, ग्रेटल कैललाश, मंगोलपुरी आणि त्रिनगर मतदारसंघातील उमेदवारांची संख्या प्रत्येकी सहा एवढी आहे. आप, काँग्रेस आणि भाजप या तीन प्रमुख पक्षांमध्येच बहुतेक मतदारसंघात लढत होत असली तरी इंडिया आघाडी आणि एनडीएतील काही पक्षांनीही उमेदवार उतरवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT