Narendra Modi : माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान मोदींनी खास संदेशाद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा

Narendra Modi Congratulates US President Donald Trump : ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प हे आपला पहिला परदेशी दौरा करत चीनला जाणार असल्याची माहिती आहे.
Narendra Modi, Donald Trump
Narendra Modi, Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.युनायटेड स्टेट्सचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली. ट्रम्प यांचे विविध राष्ट्रांच्या प्रमुखाकडून अभिनंदन होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास संदेश ट्विटवर लिहित ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

'अभिनंदन माझ्या प्रिय मित्रा, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या 47 व्या राष्ट्राध्यक्ष पदी शपथ घेतली. आपल्या दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्यासोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Narendra Modi, Donald Trump
Donald Trump Oath Ceremony : मोठी बातमी! पुन्हा एकदा अमेरिकेत 'ट्रम्प पर्व' सुरू; 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्ती उपस्थित होते. ट्रम्प हे आपला पहिला परदेशी दौरा करत चीनला जाणार असल्याची माहिती आहे. चीनसोबत ते भारताला देखील भेट देणार असल्याची चर्चा आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. भारताकडून शपथविधी सोहळ्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

ट्रम्प यांनी घडवला इतिहास

पराभूत झाल्यानंतर पुन्हा निवडणूक लढून विजय मिळवत डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहास घडवत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष झाले. भारतीय वेळेनुसार ट्रम्प यांनी सोमवारी(ता.20) रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर भारत आणि अमेरिकेतली मैत्रीसंबंध अधिकदृढ होतील, अशा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Narendra Modi, Donald Trump
Nana Patole on MVA : महाविकास आघाडीत बिघाडी अन् काँग्रेस एकाकी? ; नाना पटोलेंने स्पष्टच सांगितलं, म्हणाले....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com