New Delhi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे टेन्शन वाढवले. इंडिया आघाडी ही केवळ राष्ट्रीय स्तरावरील निवडणुकीसाठीच होती, स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबत कधीही चर्चा झाली नाही, असे आज पवारांनी स्पष्ट केले. तसेच दिल्लीली विधानसभा निवडणुकीबाबतही त्यांनी महत्वाचं विधान केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आप, काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस वगळता इतर सर्वच पक्षांनी अरविंद केजरीवालांना पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये आज शरद पवारांचीही भर पडली. त्यांनी केजरीवालांना थेट पाठिंबा जाहीर केला नसला तरी तसे सूचक विधान करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत माझी भावना आहे की केजरीवालांची मदत करायला हवी, असे शरद पवार म्हणाले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी इंडिया आघाडीवरही मोठे भाष्य केले. स्थानिक पातळीवर एकत्रितपणे निवडणुका लढण्याबाबत इंडिया आघाडीसमोर कधीही प्रस्ताव नव्हता किंवा चर्चाही झाली नाही, असे पवार म्हणाले आहेत.
दिल्लीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे आभार मानले आहेत. केजरीवालांनी सोशल मीडियात पोस्ट करत आम्हाला सहकार्याबद्दल आभार, असे म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस विरुध्द इंडिया आघाडी अशी लढत दिल्लीत पाहायला मिळणार आहे. भाजपच्या विरोधासाठी एकत्र आलेले पक्ष आता दिल्लीत काँग्रेसच्या विरोधात उभे ठाकले आहेत.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकला चलोची भूमिका घेण्यात आली आहे. त्यावरही पवारांनी भाष्य केले. स्थानिक पातळीवर एकत्रित निवडणुका लढवण्याबाबत पुढील 8-10 दिवसांत चर्चा सुरू होईल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत एकसंध राहणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.