
Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला होता. प्रामुख्याने अयोध्येत झालेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अयोध्येत निवडणुकीचे वारे वाहत आहे. मिल्कीपूर मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक होत असून लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्याची जबाबदारी चंद्रभान पासवान या नेत्याच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.
भाजपने पासवान मतदारसंघातून पासवान यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाने खासदार अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना तिकीट दिले आहे. पासवान आणि प्रसाद हे दोघेही पासी समाजातील आहेत. या निवडणुकीत सपाचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. पण भाजपनेही आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
पासवान हे रुदौलीमध्ये दोनदा जिल्हा परिषदेचे सदस्य होते. ते पेशाने वकील असून सुरूवातीपासून उमेदवारीसाठी जोरदार फिल्डींग लावली होती. सध्या ते भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांची पत्नीही रुदौलीमध्ये दोन जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. तर वडील बाबा राम लखन दास हे सरपंच होते.
अवधेश प्रसाद हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मिल्कीपूर मतदारसंघातून निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत सपाने त्यांना अयोध्येतून उमेदवारी दिली आणि ते विजयीही झाले. त्यामुळे त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. आता त्यांचाच मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने प्रसाद यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मागील काही महिन्यांपासूनच मिल्कीपूरमधील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बड्या नेत्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. या निवडणुकीतही पराभव झाल्यास भाजपसाठी ही नामुष्की ठरू शकते. तर समाजवादी पक्षालाही लोकसभेतील विजयी वाटचाल पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.