Delhi Vidhan sabha Election BJP Candidate list news Sarkarnama
देश

Delhi BJP Candidate List : भाजपने जाहीर केली 29 उमेदवारांची पहिली यादी; केजरीवालांच्या विरोधात 'हा' उमेदवार मैदानात

Delhi Vidhan sabha Election 2025 : दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. निवडणूक आयोग लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करु शकते.

Rashmi Mane

भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 29 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर याशिवाय आप विरोधात बंडखोरी करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने 'आप'च्या विरोधात उभे केले प्रमुख चेहरे

भाजपने आपल्या पहिल्या यादीत आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांच्या विरोधात अनेक प्रमुख चेहरे उतरवले आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात पक्षाने प्रवेश वर्मा यांना तिकीट दिले. कालकाजी मतदारसंघातून माजी खासदार रमेश बिधुरी यांना मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय रवींद्र सिंह नेगी यांना पुन्हा पटपडगंज मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा जागांसाठी भाजपचे उमेदवार

आदर्श नगर -राज कुमार भाटिया

बादली-दीपक चौधरी

रिठाला- कुलवंत राणा

नांगलोई जाट- मनोज शौकीन

मंगोलपुरी- राजकुमार चौहान

रोहिणी- विजेंद्र गुप्ता

शालीमार बाग- रेखा गुप्ता

मॉडल टाउन- अशोक गोयल

करोल बाग - दुष्यंत कुमार गौतम

पटेल नगर - राज कुमार आनंद

राजौरी गार्डन- सरदार मनजिंदर सिंह सिरसा

जनकपुरी- आशीष सूद

बिजवासन- कैलाश गहलोत

नई दिल्ली- प्रवेश साहिब सिंह वर्मा

जंगपुरा- सरदार तरविंदर सिंह मरवाह

मालवीय नगर- सतीश उपाध्याय

आर के पुरम- अनिल शर्मा

महरौली- गजेंद्र यादव

छतरपुर- करतार सिंह तंवर

अंबेडकर नगर- खुशीराम चुनार

कालकाजी- रमेश विधूड़ी

बदरपुर- नारायण दत्त शर्मा

पटपड़गंज- रविंद्र सिंह नेगी

विश्वास नगर- ओम प्रकाश शर्मा

कृष्णा नगर - डॉ अनिल गोयल

गांधी नगर- सरदार अरविंदर सिंह लवली

सीमापुरी- कुमारी रिंकू

रोहतास नगर- जितेंद्र महाजन

घोंडा- अजय महावर

दिल्लीमध्ये विधानसभेच्या एकूण 70 जागा असून अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. निवडणूक आयोग लवकरच दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करु शकते. पण त्याआधीच पक्षाने सर्व उमेदवार जाहीर केल्या आहेत. आतापर्यंत आपने दिल्लीतील सर्व 70 जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काँग्रेसनेही काही जागांवर उमेदवारी दिली आहे. आता भाजपने २९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT