दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रामुख्याने आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अद्याप निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी सर्व पक्षांनी जय्यत तयारी केली आहे.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीतील जनतेसाठी घोषणांचा सपाटा लावला आहे. निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांची पुन्हा मोठी घोषणा केली आहे. आप'चे सरकार आल्यास सर्व चुकीची पाण्याची बिले माफ केली जातील अशी घोषणा केजरीवालांनी आज केली आहे.
केजरीवालांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की, 'आमचे सरकार दिल्लीत मोफत पाणी देत आहे, 20 हजार लिटर पाणी फुकट मिळते, मी तुरुंगात गेल्यापासून त्यांनी (भाजप) काय केले ते मला माहीत नाही, दिल्लीतील लोकांना लाखो रुपयांची पाण्याची बिले येऊ लागली. आम आदमी पक्षाचे (AAP) सरकार पुन्हा आल्यावर ज्यांना चुकीची पाण्याची बिले आली आहेत त्यांना भरण्याची गरज नाही, निवडणुकीनंतर त्यांची चुकीची बिले माफ केली जातील. हे माझे सर्व जनतेला वचन आहे, हीच माझी हमी आहे, अशी घोषणा केजरीवालांनी केली आहे.
तर दुसरीकडे केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर आंदोलन करणाऱ्या महिलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाबमधील महिलांचा एक गट आपचे केजरीवाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने करत होता. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.
यावर अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्या महिला त्यांच्या पक्षाच्या (काँग्रेस आणि भाजप) आहेत. ती पंजाबमधून आलेली नाही. पंजाबच्या महिला आमच्यासोबत आहेत. त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. काँग्रेस आणि भाजपने अधिकृतपणे जाहीर करावे की ते दिल्लीत आप विरुद्ध एकत्र निवडणूक लढवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.