राजधानी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील एका कारमध्ये झालला भीषण स्फोट हा आत्मघाती हल्ला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीनंतर देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच पोलीस प्रमुखांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे.
या बॉम्बस्फोटात पुलवामा येथील रहिवासी उमर मोहम्मद याचे नाव समोर आले आहे. उमर मोहम्मद गाडी चालवत असल्याचा संशय आहे. उमर मोहम्मद हा व्यवसायाने डॉक्टर असून
जैश-ए-मोहम्मद मॉड्यूलशी तो संबंधित आहे.काल पोलिसांनी सात दहशतवाद्यांना अटक केली होती आणि त्यांच्याकडून २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. उमर मोहम्मदने हल्ल्याची योजना आखली असल्याची माहिती समोर येत आहे. त्याच्या साथीदारांसह त्याने गाडीत डिटोनेटर ठेवले आणि हे दहशतवादी कृत्य केले. हल्ल्यात ANFO (अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेल) वापरण्यात आले.
काल सांयकाळी झालेल्या स्फोटात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या हुंडई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला, त्या कारची अनेकदा खरेदी विक्री झाली होती. तसेच या कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं आहे.
आय-२० कारची अनेकदा खरेदी विक्री झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. ही कार पुलवामा येथील तारिक याला विकण्यात आली होती. कारच्या खरेदी विक्रीसाठी बनावट कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळे या कारच्या खऱ्या मालकाची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे या कटात सहभागी असलेल्या लोकांच्या हेतूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रमुख शहरांना विशेषता मुंबई शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीनंतर देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्वच पोलीस प्रमुखांना सतर्कचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबदारीचा इशारा देण्यात आल्याचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडून देण्यात आला आहे. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसला जास्तीत जास्त नाकाबंदी आणि कोम्बिंब ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश दिले आहेत. संशयित प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी करा असा आदेश वरिष्ठांकडून देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, शिर्डी, नागपूर येथे पोलिस संशयितांची तपासणी करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.