
Pune News : 2019 मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या पुलवामामध्ये हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. हा हल्ला जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अवंतीपोरा जवळील गोरीपोरा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आला होता. या हल्लानंतर संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. आजही ही घटना देश वासियांच्या स्मरणात आहे. अशातच दहशतवाद्यांचा पुलवामामध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा कट उघडकीस आला असून तो सुरक्षा रक्षकांनी उधळवून टाकला आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा मोठा कट उघडकीस आला असून अवंतीपोरा येथील एका सरकारी शाळेतून मोठ्या प्रणात शस्त्रास्त्रे आणि इतर वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला आहे. सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई करताना सरकारी शाळेतून हा साठा जप्त केला. तर याकारवाईमुळे दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे. तर असा हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाईवर जोर दिला आहे. पथकाकडून सर्च ऑपरेशन हाती घेतले जात आहेत. अशाच बुधवारी (ता.22) रात्री उशिरा पोलिसांना अवंतीपोरा जवळील गोरीपोरा येथे दहशतवादी एका ठिकाणी शस्त्रे आणि इतर वस्तू साठवत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफ जवानांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली.
या शोध मोहीमेवेळी सुरक्षा दलांनी सर्व संशयास्पद ठिकाणांची झडती घेतली. यावेळी, एका सरकारी प्राथमिक शाळेच्या इमारतीचीही झडती घेतली. ज्यात ज्यात एक ग्रेनेड, एक यूबीजीएल ग्रेनेड, एक डिटोनेटर, एक पिस्तूल आणि मॅगझिन आणि त्याचे काडतुसे आणि आयईडी बनवण्याचे साहित्याचा समाविष्ट आहे. या जप्तीमुळे दहशतवाद्यांचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला आहे. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पण काही संशयांना चौकशीसाठी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गावरील अवंतीपोरा जवळील गोरीपोरा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला एका आत्मघातकी बॉम्बरने केला होता. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर त्याने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लक्ष केले होते.
या हल्ल्यात सीआरपीएफ जवानांनी भरलेली बस दुर्घटनाग्रस्त झाली होती. ज्यात बसमधील 40 सैनिक शहीद झाले होते. या घटनेने संपूर्ण देश स्तब्ध झाला होता. हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. यावेळी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या ताफ्यात 60 हून अधिक वाहने होती. ज्यामध्ये 2,547 सैनिक प्रवास करत होते. यानंतर देशात राजकीय टीकेचे झोड उटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.