Delhi Blast .jpg Sarkarnama
देश

Delhi Car Blast: देशाच्या राजधानीत स्फोट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता; दिल्ली 'हाय अलर्ट'वर, ATS,NIA सह सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी 'अॅक्शन मोड'वर

Delhi high alert: राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या स्फोटानं दिल्ली हादरली आहे. या स्फोटानंतर आगीचे प्रचंड मोठे लोळ उठले, उपस्थितांच्या गर्दीतून किंकाळ्या, धावपळीनं परिसरात घबराट निर्माण झाली.

Deepak Kulkarni

New Delhi News : दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इको कारमध्ये सोमवारी(ता.10) मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली. या स्फोटात काहीजणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट सीएनजीचा नसल्याचं बोललं जात असून घातपाताचाही संशयही व्यक्त केला जात आहे. या स्फोटानंतर दिल्लीत(Delhi) हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सुरक्षा यंत्रणांचे बडे अधिकारी अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

दिल्लीतील सोमवारी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाला. त्यानंतर लगेचच फायर ब्रिगेडच्या गाड्या,फोरेन्सिक लॅबच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी तपास आणि मदत कार्य सुरू केलं आहे. लाल किल्ल्याचा हा परिसर म्हणजे नेहमीच गजबजलेला असतो. विशेषतः सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली असते. याचदरम्यान, हा स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू आणि 14 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या स्फोटानं दिल्ली हादरली आहे. या स्फोटानंतर आगीचे प्रचंड मोठे लोळ उठले, उपस्थितांच्या गर्दीतून किंकाळ्या, धावपळीनं परिसरात घबराट निर्माण झाली.

दिल्ली पोलिस, दहशतवादीविरोधी पथक(ATS), एनआयए तसेच इतरही केंद्रीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या असून बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. कारमध्ये स्फोट नेमका का झाला? यामागे काही घातपाताचा उद्देश तर नव्हता ना? याबाबत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी हरयाणातील फरिदाबादमधून एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली होती. तसेच संबंधित डॉक्टरकडून 2 एके-47 बंदुका आणि 300 किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. याचवेळी आता दिल्लीत कारमध्ये स्फोट झाल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दि्ल्लीतील या कार स्फोटानंतर लाल किल्ला परिसरातून नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्यात आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी या संपूर्ण परिसराचा पूर्ण ताबा घेतला आहे. त्यानंतर एनएसजीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आली असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT