MCA Election Result: शरद पवार-फडणवीस भेटीनं राजकारण फिरलं; लाड यांच्यासह नार्वेकर, आव्हाडांची तडकाफडकी माघार, नाईकांनी 'MCA'चं मैदान मारलं

MCA Election 2025: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे विहंग सरनाईक हे राजकीय नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक होते.
MCA Election  2025.jpg
MCA Election 2025.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई क्रिकेट असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबर रोजी होणार होती. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सर्वच राजकीय पक्षाचे बडे नेते मैदानात उतरल्यानं ही निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याची सोमवारी (ता.10) शेवटची तारीख असल्यानं सकाळपासूनच राजकीय घडामोडींनी प्रचंड वेग पकडला. दुपारनंतर या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आणि एकापाठोपाठ एक बड्या नेत्यांनी तडकाफडकी माघार घेत अजिंक्य नाईक यांनी अखेर मुंबई क्रिकेट असोसिएशनपदाच्या निवडणुकीचं मैदान मारलं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मोठा दबदबा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अध्यक्ष आणि इतर पदांबाबत चर्चा केल्यानंतर मोठ्या घडामोडींनी वेग घेतला. एमसीए निवडणुकीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठीचा अर्ज भाजप आमदार प्रसाद लाड यांची अचानक अर्ज मागे घेतला.यानंतर काही वेळातच अजिंक्य नाईक यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनपदावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट त्यांचे पट्टशिष्य आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी घेतली आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी घेतली, याची चर्चा रंगली होती. या निवडणुकीत भाजप आणि शरद पवार ज्यांना पाठिंबा देतील तो अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी होणार होता, त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत शरद पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार हे निश्चित होतं.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण झाली असून, विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक,आमदार मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड,जितेंद्र आव्हाड आणि माजी कर्णधार डायना एडुलजी यांच्यासह एकूण आठ उमेदवार रिंगणात होते. लाड यांनी माघार घेतल्यानंतर नार्वेकर,आव्हाड,एडुलजी यांनीही माघार घेतली.

MCA Election  2025.jpg
Congress MNS Alliance : महाविकास आघाडीत 'मनसे' प्रवेशाचा संभ्रम संपला? वडेट्टीवारांनी दिले संकेत, मुंबई मनपात काँग्रेस..!

उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय 'आमदार मिलिंद नार्वेकरांना जय शहा यांचा आधार हवाय', अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या त्रैवार्षिक निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी सुरू केल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी शरद पवार यांना फोन केला होता, तर नार्वेकरांनी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड आणि विहंग सरनाईक यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याने अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MCA Election  2025.jpg
Congress unity : चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये एकी तर, भाजपमध्ये बेकी कोणाच्या पथ्यावर पडणार?

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे विहंग सरनाईक हे राजकीय नेते अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. याशिवाय भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडूलजी यांनीही एमसीएच्या अध्यक्षपदासाठी रस दाखवला आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचा गट प्रबळ मानला जातो. मागील निवडणुकीत शरद पवार गट आणि भाजपचा गट एकत्र आला होता, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांना अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, दुर्दैवाने न्यूयॉर्कमध्ये त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले, त्यामुळे त्यांच्या जागी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांना संधी मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com