Karnataka Election 2023: आम आदमी पक्षाने या वर्षी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आज केजरीवाल हे कर्नाटक दौऱ्यावर होते. अशातच काल कर्नाटकमध्ये भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार याला 40 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. यानंतर पोलिसांनी छाप्यात आमदार पुत्र प्रशांत यांच्या घरातून सहा कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हाच धागा पकडत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
डबल इंजिन सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे. कर्नाटकमध्ये भाजप आमदाराच्या मुलाच्या घरात आठ कोटी रुपये पकडण्यात आले. त्याला अटक करण्यात आलेली नाही. कदाचित पुढच्या वर्षी त्यांना पद्मभूषण दिला जाईल. 8 कोटी रुपये त्याच्या घरातून सापडले पण अटक मनीष सिसोदिया यांना केली आहे. सिसोदिया यांच्या घरावर छापे टाकण्यात आले, पण काहीही सापडले नाही. या ‘डबल इंजिन’ सरकारमध्ये भ्रष्टाचार दुपटीने वाढला आहे. आम्हाला 'नवीन इंजिन' सरकार हवे आहे. असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, हिंदू मठांना जाणाऱ्या देणग्यांसाठीही कमिशन मागितले जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तरीही ते काहीच बोलले नाहीत. कर्नाटकात सर्व गोष्टी विकल्या जात आहेत. इथे प्रत्येक गोष्टीचे रेट चालू आहे. लेक्चरर होण्यासाठी 25 लाख रुपये लागतात.
त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयच्या निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या मुख्यालयात जातात आणि त्यांच्या भाषणात आम आदमी पक्षाचा उल्लेख करतात. पण आम्ही या तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवलीच नाही. तरीही पीएम मोदी घाबरले आहेत. कट्टर प्रामाणिक लोकांपासून दूर राहा असे म्हणतात. फक्त सुरक्षित राहा असे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. ज्या वेगाने 'आप'चा विकास होत आहे, त्या वेगाने पीएम मोदी आमच्या जळत आहेत,अशी टीकाही केजरीवाल यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.