Chinchwad by-election : चिंचवड जिंकूनही भाजपला चिंता; कारण काय?

Chinchwad by-election : २००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर आतापर्यंत चार निवडणुका झाल्या.
Chicnwad |BJP
Chicnwad |BJP Sarkarnama
Published on
Updated on

Chinchwad by-election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी जगताप बहुमताने विजयी झाल्या. हे जरी खरं असलं तरी ही निवडणूक त्यांच्यासाठी कठीण गेली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. पण दुसरीकडे मतदारसंघाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच 'घड्याळ' या चिन्हाला लाखभर मते मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. पण यामुळे आगामी महापालिका निवडणुका या भाजपला एकतर्फी जिंकणे सोपे राहणार नाही, हे या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत सलग तीनदा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्याने आता राहुल कलाटे यांच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२००९ मध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर आतापर्यंत चार निवडणुका झाल्या. चिंचवड हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला मतदारसंघ आहे. चिंचवड मतदार संघात महापालिकेचे १३ प्रभाग आहेत. एका प्रभागातून चार असे ५२ नगरसेवक पालिकेवर निवडून जातात. गेल्यावेळी एकट्या भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. विशेष म्हणजे चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना माननारा मोठा वर्ग आहे.

Chicnwad |BJP
Foxconn Project : गुजरातनंतर फॉक्सकॉनचे प्रकल्प तेलंगण, कर्नाटकात; महाराष्ट्र 'वेटिंग'वरच

कार्यकत्यांचे मोठे जाळे आणि आदरयुक्त दराऱ्यामुळे त्यांच्याविरोधात जाण्याचे कधी कोणी धाडस केलं नाही. सुरुवातीपासूनच चिंचवडमध्ये जगताप घराण्याचे वर्चस्व राहिले. आताच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या. चिंचवडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली. पण चिंचवडमध्ये जगताप घराण्याचे वर्चस्व असूनही अश्विनी जगताप यांच्या मतांमध्ये १५ हजारांनी घट झाली आहे.

त्यातच भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचेही चित्र होते. अनेक माजी नगरसेवकांनी मनापासून भाजपचे काम केले नसल्याची चर्चा आहे. सुरुवातीला प्रचारात सर्व यंत्रणा जगताप यांचीच होती. मग शेवटच्या टप्यात भाजप शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या यंत्रणेने प्रचाराची कमान हाती घेत घरोघरी जात प्रचार केला. जगतापांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपळेगुरवमध्ये भाजपला चांगली मतेही मिळाली. पण, संपूर्ण मतदारसंघातून ज्या प्रमाणात मताधिक्य मिळायला पाहिजे होते, तेवढे मात्र भाजपला मिळवता आले नाही. याचा आगामी महापालिका निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे.

Chicnwad |BJP
Chandrakant Patil News : 'Who is Who Is Dhangekar' चंद्रकांतदादांची पाठ सोडेना; आता कोल्हापुरातही बॅनर

मागील निवडणुकांपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यापैकी कुणातही लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात उभे राहण्याची ताकद नव्हती. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही कधी उमेदवार दिलेला नाही. राष्ट्रवादीतील बहुतांश माजी नगरसेवक, पदाधिकारी लक्ष्मण जगताप यांच्याच तालमीत तयार झाल्याने त्यांना जगतापांच्या प्रस्थाची जाण होती. यामुळे जगतापांसमोर लढण्याचे कोणी धाडस करत नव्हते. तुल्यबळ जगताप यांच्यासमोर राष्ट्रवादी गर्भगळित झाली होती. त्या आव्हानात्मक परिस्थितीतही २०१ ९ मध्ये राहुल कलाटे यांनी जगतापांना आव्हान दिले आणि तुल्यबळ लढतही दिली.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडे इच्छुकांची रांग लागली होती. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी दिली. निवडणुकीत महाविकास आघाडीने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. यातून एक लाखापर्यंत मते मिळविण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला यश आले. तिरंगी लढत होऊनही घड्याळाला मिळालेली मते राष्ट्रवादीसाठी दिलासादायक असली तरी भाजपसाठी मात्र डोकेदुखी ठरवणारी आहे. या वेळी झालेली तिरंगी लढत त्यातून झालेली मतविभागणी आणि सहानुभूतीचा भाजपला फायदा झाला. पण यापुढील निवडणुकांमध्ये भाजपला मोठं कामं करावं लागणार आहे.

Chicnwad |BJP
Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

याशिवाय स्वत: विरोधीपक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीच या निवडणुकीत लक्ष घातल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून काम केलं. चिंचवडमध्ये घड्याळाला मिळालेल्या लाखभर मतांमुळे राष्ट्रवादीला उभारी मिळाली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून बॅकफुटवर गेलेल्या राष्ट्रवादीला आगामी महापालिकेतील सत्ता मिळण्यासाठी आशेचा किरण झाला आहे.

गेल्या वेळी महापालिकेतील गमावलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी आता अजित पवार चिंचवडमधील मतांचा बारकाईने अभ्यास करून उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. चिंचवड पोटनिवडणुकीने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये महापालिका निवडणुक अटतटीची होणार, हे नक्की. पण लाखभर मते मिळूनही राष्ट्रवादीच्या नाना काटेंना मात्र स्वतःच्याच पिंपळे सौदागर प्रभागातून पुरेसे मताधिक्य मिळाले नाही, हेही तितकेच सत्य आहे.

तर दुसरीकडे कोणतीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची पराभवाची हट्रिक झाली. त्यातच कलाटेंची पोटनिवडणुकीचे डिपॉजिटही जप्त झाले. गेल्या दहा वर्षांत कलाटेंचा यांचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाल्याने मतदारांनी कलाटेंना सपशेल नाकारल्याचे दिसते. ज्या वाकड प्रभागातून कलाटे महापालिकेवर निवडून गेले तिथेही भाजपला मिळालेली मते त्यांच्यासाठी चिंचाजनक आहेत.

सलग तीनवेळेच्या पराभवामुळे त्यांच्या कलाटेंच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने नाकारले तर कलाटेंसमोर भाजप किंवा शिंदे गटात जाण्याशिवाय दुसरा पर्याय पर्याय नाही. पण कलाटेंचा इतिहास पाहता भाजपही त्यांना किती जवळ करेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com