Supreme Court, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : कबुलीनंतर केजरीवालांच्या ‘त्या’ चुकीला माफी? सुप्रीम कोर्टाकडून दिलासा...

Supreme Court News : सुप्रीम कोर्टात आज मानहानीच्या दाव्यावर सुनावणी झाली. या वेळी केजरीवालांनी चुकीची कबुली दिली आहे.  

Rajanand More

New Delhi News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सुप्रीम कोर्टाकडून मानहानीच्या प्रकरणात दिलासा मिळाला. यू-ट्यूबरचा एक व्हिडिओ रिट्विट केल्याप्रकरणी केजरीवालांना दाखल करण्यात आलेल्या दाव्याची आज कोर्टात सुनावणी झाली. त्यावर केजरीवालांनी आपण चूक केल्याची कबुली दिली. त्यामुळे कोर्टाने हायकोर्टाला पुढील कार्यवाही न करण्याचे आदेश दिले आहेत. (Arvind Kejriwal News)

यू-ट्यूबर ध्रुव राठी यांचा एक व्हिडिओ केजरीवाल यांनी रिट्विट केला होता. या प्रकरणी विकास सांकृत्यान ऊर्फ विकास पांडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) केजरीवालांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पांडे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक असून, सोशल मीडियात ‘आय सपोर्ट नरेंद्र मोदी’ या पेजचे संस्थापक आहेत.

केजरीवाल यांनी रिट्विट केलेला व्हिडिओ ‘बीजेपी आयटी सेल पार्ट २’ मध्ये आपल्याविषयी बदनामीकारक मजकूर असल्याची तक्रार करत पांडे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे. कोर्टानेही अपमानजनक व्हिडिओ रिट्विट करणे हा मानहानीच्या समान असल्याचे स्पष्ट केले होते. त्याविरोधात केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केजरीवालांच्या या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी झाली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी न्यायालयात केजरीवालांची बाजू मांडली. व्हिडिओ रिट्विट करून आपण चूक केल्याची कबुली केजरीवालांनी दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने 11 मार्चपर्यंत या प्रकरणावर कार्यवाही न करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाही आता केस बंद करायची का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी केजरीवालांच्या माफीबाबत कोर्टाला सांगू, असे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणात केजरीवालांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT