Chennai News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दक्षिणेत दिलासा मिळाला आहे. अण्णा द्रमुकने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिणेत भाजपला मित्रपक्ष उरला नव्हता. कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ झाल्यानंतर पक्षाची चिंता अधिकच वाढली होती. अखेर आज पक्षाला नवा भिडू मिळाला आहे. (Lok Sabha Election 2024)
तमिळनाडूतील (Tamilnadu) तमिळ मानिला काँग्रेसने (TMC) आगामी लोकसभा निवडणूक भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीएसोबत लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रमुख जी. के. वासन यांनी आज याबाबत घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उद्या तिरुपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘एआयएडीएमके’ने 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत आघाडी केली होती. या आघाडीमध्ये वासन हे ‘एआयएडीएमके’सोबत होते. वासन यांनी अण्णा द्रमुकशी असलेली आघाडी संपुष्टात आल्याचे जाहीर करून भाजपला साथ दिली. अण्णा द्रमुकने सप्टेंबर 2023 मध्येच एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दक्षिणेतील भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष अण्णा द्रमुक एनडीएतून बाहेर पडल्याने पक्षासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी दक्षिणेतही भाजपने कंबर कसली आहे, पण एकही मित्रपक्ष सोबत नसल्याने अडचणी वाढल्या होता.
वासन यांच्यामुळे भाजपला थोडाफार दिलासा मिळणार आहे. त्यांचा पक्ष 1996 पासून सक्रिय राजकारणात असला तरी अजून राज्यात छाप पाडता आली नाही. 2002 हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आला होता, पण पुन्हा 2014 मध्ये वासन यांनी काँग्रेसमधून पाहेर पडत पक्ष स्थापन केला आहे. त्यामुळे वासन यांच्या पक्षाचा फारसा दबदबा नसला तरी भाजपला किमान एक मित्रपक्ष आल्याचे समाधान मिळाले आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.