Supreme Courts Decision :  Sarkarnama
देश

Arvind Kejriwal Meets D Raja : पवार, ममतादीदींच्या भेटीनंतर केजरीवालांनी घेतली CPI नेत्याची भेट ; केली ही मागणी

Supreme Courts Decision : केंद्र सरकाराला विरोध करण्यासाठी त्यांनी कम्युनिस्ट पार्टीकडे समर्थन मागितले आहे.

सरकारनामा ब्युरो

Delhi News : सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारला अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत अधिकार दिला. पण काही दिवसानंतर हा अधिकार केंद्र सरकारने परत घेतला आहे. याबाबत केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. या आदेशाच्या विरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कंबर कसली आहे. केंद्र सरकाराला विरोध करण्यासाठी त्यांनी कम्युनिस्ट पार्टीकडे समर्थन मागितले आहे.

या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आज (बुधवारी) कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव डी राजा यांची भेट घेतली. या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी यापूर्वी केजरीवाल यांनी विरोधी पक्षांचे समर्थन मागितले आहे. त्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मलिक्कार्जून खर्गे, काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची ते भेट घेणार आहेत.

राजधानी दिल्लीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे अधिकार कुणाकडे असणार? यावर २०१५ पासून दिल्ली राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात बेबनाव सुरू आहे. ११ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय अधिकार लोकांनी निवडून दिलेल्या राज्य सरकारला असल्याचा निकाल दिला होता. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने एक नवा अध्यादेश काढून प्रशासकीय अधिकार पुन्हा एकदा नायब राज्यपाल यांच्याकडे असतील असे संकेत दिले आहेत.

राजधानी दिल्लीत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे अधिकार दिल्ली सरकारकडून पुन्हा काढून केंद्र सरकारने एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारच्या अध्यादेशामुळे नक्कीच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT