Sanjay Raut News : विखे-पाटलांना राऊत अडचणीत आणणार ; ED कडे एक्सपोज करणार..

Radhakrishna Vikhe Patil : या पैशांचे मनी लाँड्रिंग झाले आहे
Sanjay Raut,  Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Raut, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : "झाकिर नाईक संदर्भात तुम्ही लोकांना अटक करत आहात, मग राधाकृष्ण विखे-पाटील का सुटत आहेत? त्यांच्या कारखान्याची प्रकरण ही अत्यंत भयानक आहेत, लवकरच ते मी एक्सपोज करेन, असा इशाराही बुधवारी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारला दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

"झाकीर नाईक ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे. त्याच्याकडून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संस्थेला 4 ते 5 कोटी देण्यात आले आहेत, या प्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला पाहिजे," अशी मागणी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut,  Radhakrishna Vikhe Patil
Sharad Pawar Threat Case : पवारांना धमकी दिल्याची दोन कारणे उघडकीस ; महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे..

तमिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीकडून कारवाई केली आहे. त्यानंतर ईडीने सेंथिल यांना अटक केली आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी संतापले. यावेळी ईडीच्या कारवाईबाबत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

Sanjay Raut,  Radhakrishna Vikhe Patil
Eknath Shinde News : 'त्या' पाच मंत्र्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री शिंदेंचं मोठ विधान ; मला सगळी माहिती..

"दिल्ली, तामिळनाडूमध्ये आणि महाराष्ट्रात छापा टाकून मंत्र्यांना नेत्यांना अटक केली जाते आहेत. लवकरच दादा भूसे यांच्याविषयी ईडीकडे तक्रार करणार आहे. सीबीआयकडे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मी तक्रार केली होती. पुढच्या दोन दिवसांत ईडीकडे तक्रार करणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 178 कोटी रुपये शेतकऱ्यांचे जमा केले. गिरणा सहकारी साखर कारखाना बसवण्यासाठी हे पैसे गोळा केले. या पैशांचे मनी लाँड्रिंग झाले आहे," असा आरोप राऊतांनी केला आहे.

"राहुल कुल, दादा भुसे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गैरव्यवहारांबाबतची माहिती देऊन देखील कारवाई करण्यात येत नाही. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबाबत आणखी माहिती ईडीला देण्यात येणार असून त्यांचा बचाव कधीपर्यंत करण्यात येणार," असे राऊत म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com