Delhi CM Rekha Gupta Attack News Sarkarnama
देश

CM Rekha Gupta Attack: CM रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे गुजरात कनेक्शन

Delhi CM Rekha Gupta Attack News update: सुप्रीम कोर्टानं बेवारस कुत्र्यांबाबत दिलेल्या निर्णयानंतर तो दिल्ली येथे आला होता. तो मनोरुग्ण असल्याचे त्यांच्या आईचे म्हणणे आहे. यापूर्वीही तो दिल्ली येथे आला असल्याचे त्याच्या आईनं सांगितलं.

Mangesh Mahale

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा पोलिसांचा ताब्यात आहे. पोलिस त्यांची कसून चौकशी करीत आहेत. केंद्रीय गृह मंत्र्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे. तो गुजरातमधील राजकोट येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

राजेश भाई खिमजी सकरिया असे त्याचे नाव असल्याची प्राथमिक माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याच्या ओळखीची व्यक्ती कारागृहात असून त्यांना मुक्त करावे, यासाठी तो अर्ज घेऊन दिल्लीत आला होता.

दिल्ली पोलीस गुजरात पोलिसांच्या संपर्कात असून त्यांनी आरोपीचे आधार कार्ड मिळवले आहे. आपण पशु-प्राणी प्रेमी असल्याचा दावा आरोपी राजेश भाई खिमजी सकरिया याने केला आहे.

सुप्रीम कोर्टानं बेवारस कुत्र्यांबाबत दिलेल्या निर्णयानंतर तो दिल्ली येथे आला होता. तो मनोरुग्ण असल्याचे त्यांच्या आईचे म्हणणे आहे. यापूर्वीही तो दिल्ली येथे आला असल्याचे त्याच्या आईनं सांगितलं. तो दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे गेला होता, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांच्या आईनं सांगितले. चौकशी करण्यासाठी गुजरात पोलिस आरोपीच्या आईच्या निवासस्थानी रवाना झाली आहे.

जनता दरबार सुरु असताना काही कागदपत्रे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे दिल्यानंतर आरोपीने अचानक मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, असे भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर यांनी सांगितले. पण हल्लापूर्वी त्याने केलेल्या विधानामुळे तो कुठल्यातरी पक्षांशी संबधीत असल्याचे दिसते. अवस्थ असल्याने तो दिल्ली आला होता.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता या नागरिकांसी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवत असतात. हे विरोधकांना सहन होत नाही. त्या आपल्या खूप वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्यावरील हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप दिल्लीचे मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी केला आहे.

गुप्ता यांच्या हल्लानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दिल्ली काँग्रेसने प्रमुख देवेंद्र यादव यांच्या याघटनेचा निषेध केला आहे. मुख्यमंत्री जर सुरक्षित नसतील, तर सामान्य जनता आणि महिला यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न यादव यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि मुख्य सचिव घटना स्थळी पोहचले आहेत.

रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला का झाला?

दिल्लीचे भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. आम आदमी पार्टीच्या नेत्या, माजी मुख्यमंत्री आतिशी यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT