Kolhapur News: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत बांधणी सुरू आहे. सरचिटणीस आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्यानंतर कोल्हापूर पश्चिम जिल्ह्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली.
या निवडीवरून कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत नाराजीचा भडका उडाला आहे. निवडीवर नाराजी व्यक्त करत अनेकांनी बाबतची तक्रार आमदार आणि मंत्र्यांपर्यंत केली आहे. तर त्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या वर्तुळात चांगली सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपमधील संघटन हे दर तीन वर्षाला बदलत असते. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. महायुती म्हणून राज्यात प्राबल्य असल्याने अनेक तरुणांचा आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांचा ओढा भाजपकडे वाढलेला दिसून येत आहे.
त्यातच जनमत असलेला नेता भाजपच्या संपर्कात आल्याने त्याला भाजपमधील संघटनात्मक पदांची अपेक्षा आहे. मात्र सोमवारी भाजपमधील पूर्व पश्चिम जिल्ह्यातील संघटनात्मक पदाधिकाऱ्यांची नवीन निवड जाहीर झाली. त्यावरून भाजपमधील अंतर्गत नाराजीचा भडका चांगलाच उडाल्याचे दिसून येते.
नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये युवा मोर्चा अध्यक्ष आणि महिला मोर्चा अध्यक्षवरून मधील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपच्या संघटन नियमांमध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर किमान ४० वर्ष वयोमर्यादा असणाऱ्या पदाधिकाऱ्याला या पदावर संधी दिली जाते.
मात्र जिल्हाध्यक्षांनी नियम डावलून पद दिल्याचा आरोप काही नाराज पदाधिकाऱ्यांकडून खाजगीत होताना दिसत आहे. तर जाहीर झालेल्या महिला मोर्चा अध्यक्ष पदाला देखील काहींनी विरोध केला आहे. त्याबाबतची तक्रार थेट एका मंत्र्यांपर्यंत गेल्याचे देखील सांगितले जाते.
या नाराजी नाट्यनंतर काही पदावरील नियुक्त पुन्हा केले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. भाजपमधीलच काही प्रमुख नेते आणि आमदारांनी जाहीर झालेली नावे पुन्हा बदलून नका, अशा सक्त सूचना दिल्याचे देखील कळते. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर येताना दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.