Manish Sisodiya Sarkarnama
देश

Manish Sisodia News : भाचीमुळं सिसोदिया एक वर्षानंतर येणार जेलबाहेर; पण...

AAP Government : दिल्लीतील आप सरकारने आणलेल्या मद्य धोरणात घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर सीबीआय आणि ईडीकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Rajanand More

New Delhi : दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील विशेष न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला आहे. त्यामुळे जवळपास एक वर्षानंतर ते जेलबाहेर येणार आहेत. मात्र, हा जामीन केवळ तीन दिवसांसाठीच आहे. (Manish Sisodia News)

विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी 13 ते 15 फेब्रुवारी असा तीन दिवसांसाठी जामीन मंजूर केला आहे. सिसोदिया यांच्या भाचीचा 14 तारखेला विवाह आहे. त्यासाठी सिसोदियांनी विवाहाला उपस्थित राहण्यासाठी तात्पुरता जामीन देण्याची मागणी न्यायालयात केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

कथित मद्य घोटाळ्याची चौकशी सीबीआय (CBI) व ईडीकडून (ED) केली जात आहे. सिसोदिया यांना या प्रकरणात मनी लाॅर्ण्डिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून ते जेलमध्ये आहेत. त्यांच्याकडून नियमित जामिनासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कोर्टाकडून दिलासा मिळताना दिसत नाही. अखेर भाचीच्या विवाहाच्या निमित्ताने ते जेलबाहेर येणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली मद्य धोरणातील घोटाळा समोर आल्यानंतर ते रद्द करण्यात आले आहे. सिसोदिया यांना मागील वर्षी 26 फेब्रुवारीला सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने 9 मार्चला त्यांना तिहार जेलमध्ये अटक केली होती. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहेत. (Excise Policy Case)

दरम्यान, याच प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाही ईडीने पाच वेळा चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे, पण प्रत्येकवेळी त्यांनी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे ईडीने दिल्लीतील कोर्टात याविरोधात याचिका केली होती. त्यानंतर कोर्टाने केजरीवालांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता केजरीवालांकडून कोर्टात काय सांगितले जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT