Supreme Court News : उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून शिक्कामोर्तब

Deputy CM Post : उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती असंविधानिक नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
Dhananjay Chandrachud
Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : मागील काही वर्षांत देशात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राज्यांमध्ये दोन-दोन उपमुख्यमंत्री केले जात आहेत. प्रामुख्याने भाजपकडून बहुतेक राज्यांमध्ये हा फॉर्म्युला राबवला जात आहे. तसेच इतर राज्यांमध्येही किमान एक उपमुख्यमंत्री असल्याचे दिसते. याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. (Supreme Court News)

सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेवर आज सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या वेळी सरन्यायाधीश म्हणाले, तुम्ही एखाद्याला उपमुख्यमंत्री म्हटले तरी त्यामध्ये मंत्री हा उल्लेख असतो. उपमुख्यमंत्री हे राज्यातील महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यामुळे संविधानाचे उल्लंघन होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Dhananjay Chandrachud
Bihar floor test : उपमुख्यमंत्रीच म्हणाले, खेला हो गया! तेजस्वी यादव नितीश कुमारांचा डाव उलटवणार?

संविधानामध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे संविधानातील आर्टिकल 14 चे उल्लंघन होते, असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले होते. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत यामुळे चुकीचे पायंडे पडतील, असे म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आंध्र प्रदेशमध्ये पाच उपमुख्यमंत्री

देशातील अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड यांसह आणखी काही राज्यांमध्ये प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री आहेत, तर आंध्र प्रदेशमध्ये तब्बल पाच उपमुख्यमंत्री आहेत. देशात सर्वाधिक उपमुख्यमंत्री याच राज्यात आहेत.

उपमुख्यमंत्र्यांना संविधानिक दर्जा नसला तरी त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे सर्व लाभ मिळतात. मुख्यमंत्र्यांना सहायक म्हणून तसेच सहयोगी पक्षाच्या नेत्यांना सत्तेत मोठा वाटा मिळावा, या उद्देशाने उपमुख्यमंत्री पद दिले जाते.  

R

Dhananjay Chandrachud
मोठी बातमी! अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर? नार्वेकरांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com