Tahir Hussain Sarkarnama
देश

Tahir Hussain News : दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी ताहिर हुसैन यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा!

Delhi Dangal case : विधानसभा निवडणुकीसाठी तुरुंगातून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात.

Mayur Ratnaparkhe

Delhi riots accused Tahir Hussain :आम आदमी पार्टीचे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे, ज्यावर न्यायालयाने आज सुनावणी केली. ताहिर हुसैन दिल्ली दंगली प्रकरणी जेलमध्ये आहे. हुसैन यांच्यावतीने बाजू मांडणारे वकील राजीव मोहन यांनी न्यायालयात आपला युक्तिवाद केला.

दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले की, फेब्रुवारी 2020मध्ये झालेल्या दंगलीशी निगडीत अनेक प्रकरणातील आरोपी आम आदमी पार्टीचे(AAP) माजी नगरसेवक ताहिर हुसैन जेलमधूनच आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी दंगलीशी निगडीत एका हत्येच्या प्रकरणात अंतरिम जामिनाची मागणी करणाऱ्या हुसैन यांच्या याचिकेवर पोलिसांच्यावतीने उत्तर देत म्हटले की, अशी अनेक उदाहरण आहे. जेव्हा कैद्यांनी तुरुंगातूनच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा तोंडी हेही सांगितले की, हुसैन तुरुंगातूनच उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. तर आरोपीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलाने उत्तर दिले की, त्यांना एका राष्ट्रीय पक्षाने निवडले आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याशिवाय त्यांना प्रचार व संपत्तीचीही घोषणा करावी लागेल.

वकिलाने पुढे म्हटले की, मागील वर्षी लोकसभा निवडणूक(Loksabha Election) लढण्यासाठी राशिद इंजीनियरला ट्रायल कोर्टाने अंतरिम जामीन दिला होता. या गोष्टीवरही जोर दिली की, ताहिर हुसैन मार्च २०२०पासून ताब्यात आहे आणि संबंधित न्यायालयांकडून दोन अन्य दंगलीच्या प्रकरणात अंतरिम जामिनातून दिलासा मागण्याच्या प्रक्रियेत आहे. न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवारी ठरवली आहे.

ताहिर हुसैन यांनी मागील आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करून मुस्तफाबाद विधानसभा क्षेत्रात एमआयएमच्या(AIMIM) तिकीटावर निवडणूक लढण्यासाठी 14 जानेवारी ते 9 फेब्रुवारी पर्यंत अंतरिम जामिनाची मागणी केली होती. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे, बँक अकाउंट सुरू करणे आणि प्रचार करण्यासाठी दिलासा मागितला होता. वकील तारा नरुला यांच्याद्वारे दाखल अर्ज प्रकरणात हुसैन या खटल्यातील प्रलंबित जामीन अर्जाचा भाग होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT