India Alliance News News : आश्वासन 4 महिन्यांत पूर्ण, गडबडीशिवाय निवडणूक! राहुल गांधींचे मित्र मोदींवर फिदा

Jammu and Kashmir CM Omar Abdullah Congress Leader Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत.
PM Narendra Modi, Rahul Gandhi
PM Narendra Modi, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : इंडिया आघाडीमध्ये सगळंकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एकाकी पडलेल्या काँग्रेसच्या विरोधात आघाडीतील सर्वच मित्रपक्ष उभे ठाकले आहेत. त्यातच आता जम्मू आणि काश्मीरमधून काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणारी बातमी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मित्र व मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भलतेच फिदा झाले आहेत.

पंतप्रधान मोदी हे सोमवारी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज एका बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अब्दुल्लाही उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अब्दुल्लांनी मोदींचे तोंडभरून कौतुक केले. केंद्रशासित प्रदेशात शांतीपूर्ण वातवारण निवडणूक पार पाडल्याबदद्ल त्यांनी मोदींचे आभारही मानले.

PM Narendra Modi, Rahul Gandhi
Mahakumbh Mela 2025 : स्टीव जॉब्स यांची पत्नी झाली 'संन्यासी'; मिळालं नवं नाव अन् गोत्र!

अब्दुल्ला म्हणाले, तुम्ही (पीएम मोदी) आंतरराष्ट्रीय योग दिनी श्रीनगरमध्ये एका कार्यक्रमात तीन महत्वाच्या बाबी सांगितल्या होत्या. तुम्ही म्हणाला होता की, मी मनातील अंतर आणि दिल्लीपर्यंतच अंतर संपवण्यासाठी काम करत आहे. हे तुम्ही तुमच्या कामातून सिध्द केले आहे. लवकरच निवडणुका होतील, असेही तुम्ही सांगितले होते. तुम्ही तुमचा शब्द पाळला आणि चार महिन्यांत निवडणूक झाली. नवे सरकार आले.    

हरियाणासह महाराष्ट्रात ईव्हीएम घोटाळ्याबाबत काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी बोट ठेवले. पण अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरमधील निवढणुकीदरम्यान सत्तेचा दुरुपयोग झाल्याची एकही तक्रार नसल्याचे मोदींसमोरच सांगितले. कोणत्याही गडबडीशिवाय निवडणूक झाल्याचे अब्दुल्लांनी स्पष्ट केले.

PM Narendra Modi, Rahul Gandhi
PM Kisan Yojana: निर्मला सीतारमण शेतकऱ्यांचा 'सन्मान' वाढणार; बजेटमध्ये बुस्टर डोस...

राज्याचा दर्जा

अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी आग्रही आहेत. त्यासाठी ते सातत्याने दिल्लीचा दौराही करत आहेत. सोमवारी त्यांनी पंतपधान मोदींसमोर हा मुद्दा काढला. ते म्हणाले, मोदीजी, तुम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. लोक मला याविषयी विचारतात. मी त्यांना सांगतो, मोदींनी निवडणुकीचे आश्वासन पूर्ण केले, लवकरच हे आश्वासनही पूर्ण होईल आणि राज्याचा दर्जा मिळेल.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com