Kangana Ranaut controversy Sarkarnama
देश

Kangana Ranaut controversy : भाजपच्या कंगनानं, शेतकरी महिलांचा अपमान केला, 100 रुपयांच्या रोजंदारीवाले म्हटले; 86 वर्षांच्या आजीने कोर्टात खेचले, कर्जबाजारी झाल्या तरी...

Delhi Farmers Protest: Woman Files Case in Bathinda Against Himachal BJP Kangana Ranaut Over Insult Allegation : दिल्ली शेतकरी आंदोलनातील महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप खासदार कंगना राणावत यांच्याविरोधात 86 वर्षांच्या शेतकरी महिला चार वर्षांपासून खटला लढत आहेत.

Pradeep Pendhare

Himachal BJP Kangana Ranaut : भाजप खासदार कंगना राणावत यांनी, दिल्लीतील शेतकरी आंदोलनात, सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांना 100-100 रुपयांच्या रोजंदारीवर आणल्याचे म्हटले. हे म्हणताना, कंगना हिने 2020 मध्ये ट्विट देखील केलं होतं. कंगना हिच्या टिप्पणीने दुखवलेल्या 86 वर्षांच्या महिला शेतकरी महिंदर कौर चांगल्याच दुखवल्या आहेत.

महिंदर कौर यांनी 2021मध्ये कंगनाविरुद्ध खटला दाखल केला. या लढाईत त्या कर्जबाजारी झाल्या आहेत. एकीकडे महिंदर कौर स्वाभिमानाची लढाई लढत असतानाच, कंगना हिला नोटिसा, पत्र पाठवून देखील या खटल्यात एकदाही न्यायालयात हजर राहिल्या नाहीत.

भाजप (BJP) खासदार कंगना राणावत हिने दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांचा अपमान केला होता. त्यांना 100-100 रुपयांच्या रोजंदारीवर येणाऱ्या महिला म्हटलं होतं. यामुळे पंजाबच्या भटिंडामधील महिंदर कौर चांगल्याच दुखावल्या. त्यांनी कंगनाविरुद्ध 2021 मध्ये खटला दाखल केला.

कंगनाविरुद्धच्या या न्यायालयीन लढाईला आता चार वर्षे झाली आहेत. शेतकरी (Farmer) महिंदर कौर माघार घ्यायला तयार नाहीत. विशेष म्हणजे, या चार वर्षांत महिंदर कौर कर्जबाजारी झाल्या आहेत. सात लाखांहून अधिक कर्ज झाले आहे. तरी महिंदर कौर यांनी स्वाभिमानाच्या या लढाईत माघार घेणार नसल्याचे म्हटले आहे. या खटल्याची पुढची सुनावणी पाच जानेवारीला होणार आहे.

शेतकरी महिंदर कौर यांना आता न्यायालयीन लढाईत यश येताना दिसत आहे. न्यायालयाने या लढाईची गंभीर दखल घेतली असून, कंगना हिला वैयक्तिकरित्या हजर राहण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, भटिंडा न्यायालयाच्या याचिकेविरोधात कंगना हिने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथं याचिका फेटाळल्यावर सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.

कंगनाला माफी मागावीच लागेल

सर्वोच्च न्यायालयाने भटिंडा न्यायालयाला हे प्रकरण निकाली काढण्याचा आदेश दिला आहे. कंगना हिच्याकडून माफी मागितली आहे, असे सांगताना हा वाद कशासाठी?, असा प्रश्न केला आहे. परंतु महिंदर कौर यांनी आम्ही चार वर्षे दुःखातून गेलो. त्यावेळी विचारपूस केली नाही. कंगनाने आमची माफी मागावी. कोर्ट त्यांना देईल ती शिक्षा मान्य राहील, असे म्हटले आहे.

कंगनाला न्यायालयात यावेच लागेल...

मंहिदर कौर यांनी या खटल्याची पार्श्वभूमी सांगताना, न्यायालयाच्या चार वर्षांच्या लढाईत कंगना एकदाही न्यायालयात हजर राहिली नाही. पत्र पाठवली. नोटिसा पाठवल्या. दोन वर्षांनंतर तिचे वकील उच्च-सर्वोच्च न्यायायलात गेले. तिथं माफी मागितली नाही. आता अर्ज दिला आहे की, येण्यात धोका आहे. सेलिब्रिटी असो वा, सामान्य माणूस, कायद्यासमोर सर्व सारखेच असतात. त्यामुळे कंगनाला न्यायालयात हजर राहावेच लागेल, असे सांगितले.

मंहिदर कौर यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

कंगनाविरोधात कायदेशीर लढाई लढताना सर्वसामान्य शेतकरी मंहिदर कौर यांना अनेक वैयक्तिक अडचणींचा सामना करावा लागतो. एक वर्षापूर्वी सुनेचं निधन झालं. एकुलता एक मुलाला सर्पदंश झाला. तो गंभीर आजारापर्यंत पोहोचला आहे. उपचारासाठी खर्च सुरू आहेत. पण कंगनाविरोधातील कायदेशीर लढाईत मंहिदर कौर माघार घेण्यास तयार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT